शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

CoronaVirus News : चिंताजनक! राज्यात कोरोनाचे १० हजारांहून अधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 06:28 IST

राज्यात कोरोनाच्या मृत्यूंनी १० हजारांचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत एकूण १० हजार ११६ बळी गेल्याची नोंद आहे.

मुंबई : राज्यात ‘पुनश्च हरिओम’नंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. शनिवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजेच ८ हजार १३९ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात कोरोनामुळे २२३ बळी गेले. राज्यात कोरोनाच्या मृत्यूंनी १० हजारांचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत एकूण १० हजार ११६ बळी गेल्याची नोंद आहे. सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण २ लाख ४६ हजार ६०० बाधित रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के झाले असून मृत्यूदर ४.१ टक्के आहे. राज्यात अतिजोखमीच्या आजारांमुळे ७० टक्के रुग्णांचे मृत्यू झाले असून ३० टक्के मृत्यू अन्य कारणांमुळे झाले आहेत. एकूण मृत्यूंमध्ये ६५ टक्के पुरुष तर ३५ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे.देशभरात एकाच दिवसात २७,११४ नवे रुग्णदेशभरात शनिवारी एकाच दिवसात कोरोनाचे २७ हजार १४४ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८ लाख २० हजार ९१६ इतकी झाली आहे.या संसर्गाने आणखी ५१९ जण मरण पावले असून बळींची संख्या २२ हजार १२३ इतकी झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले. देशात अवघ्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या सात लाखांवरून आठ लाखांवर गेली आहे. कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५,१५,३८६ झाली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी पूर्णपणे बरे झालेल्यांचे प्रमाण ६२.७ टक्के एवढे आहे. देशात सध्या २,८३,४०७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस