शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मास्कपासून कधी होणार सुटका?; टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी सांगितली नेमकी वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 08:12 IST

दुसरी लाट मंदावली; टास्क फोर्सच्या डॉक्टरांची माहिती

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसींच्या डोसने राष्ट्रीय पातळीवर १०० कोटी लसींचा टप्पा पार केला. यात राज्याची भूमिका महत्त्वाची आहे. कारण राज्याची व्यापकता लक्षात घेता लस उत्पादक आणि आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ या दोन घटकांमुळे लसीकरण मोहीम यशस्वी होऊ शकली आहे. कोरोनाशी केलेल्या संघर्षाला २० महिने उलटले असले तरीही मास्कपासून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला आणखी वर्ष लागेल, असे निरीक्षण राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मंदावली असली तरी तिसऱ्या लाटेची भीती मात्र कायम आहे. सध्या जरी तिसऱ्या लाटेची शक्यता नसली तरी दिवाळीनंतर कोरोनाचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाच व्यक्त होत आहे. राज्यात ७० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ३५ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यात आणखी वेगाने लसीकरण होणार आहे. लसीकरणासाठी मिशन कवच कुंडलचा फायदा झाला, अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी दिली. सध्या कोणताही नवीन व्हेरियंट आढळला नसून फक्त डेल्टा व्हेरियंट राज्यात सर्वत्र आहे. तसेच दिवाळी नंतर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.  कोरोनाच्या नियमांचे व्यवस्थित पालन केले तर तिसरी लाट थोपवता येईल. दरम्यान, राज्यात दररोज दीड लाख चाचण्या होत आहेत. चाचण्या करण्यात दोन लाख ही संख्या उच्चांकी आहे. चाचण्या कमी केलेल्या नाहीत. त्यामुळे मागील दोन-चार महिन्यांत कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याचे दिसत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना आणि लसीकरण हेच महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.कोरोनाविरोधी लढ्यात लसीकरण प्रभावी शस्त्रदेशाने १०० कोटी लस डोसांचा टप्पा पार करणे हे आरोग्य यंत्रणेचे अभूतपूर्व यश आहे. कोविड प्रतिबंधक लस हेच कोविडविरोधातील प्रभावी शस्त्र आपल्या हाती असून, या माध्यमातून यंत्रणांनी सर्वांना सुरक्षित कवचकुंडल देण्याचे वेगाने प्रयत्न करावेत, अशी आशा आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी जनजागृती करून उर्वरित लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणांनी लसीकरणाच्या जनजागृतीसाठी फिरते वाहन, दर्शनी फलक, तसेच समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यासही सुचविले आहे. आगामी काळातील सण व उत्सव साजरे करताना कोविडचे नियम तंतोतंत पाळले जातील याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी.      - डॉ. प्रदीप व्यास, अपर सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या