शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: एकाच महिन्यात तब्बल १० हजार मुलं कोरोना पॉझिटिव्ह; 'या' जिल्ह्यानं वाढवली राज्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:45 IST

दुसऱ्या लाटेत एकाच कुटुंबातील सर्व व्यक्ती बाधित होण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे लहान मुलेही बाधित झाली, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले.

अहमदनगर : मे महिन्यात जिल्ह्यात शून्य ते अठरा वयोगटातील दहा हजार मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण साडेअकरा टक्के आहे. मात्र, मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने ते प्राथमिक उपचार घेऊन बरे होत आहेत, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. एप्रिलमध्ये जिल्ह्यात ८० हजार, तर मे महिन्यात ८७ हजार कोरोनाबाधित आढळले. या दोन महिन्यांत रुग्ण बाधित होण्याचा दर हा अनुक्रमे ४२ व ५१ टक्के होता. या बाधितांत मुलांचीही संख्या मोठी आढळली आहे. मे महिन्यात ८७ हजार रुग्णांपैकी दहा हजार मुले बाधित आढळली. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत साडेअकरा टक्के आहे. दुसऱ्या लाटेत एकाच कुटुंबातील सर्व व्यक्ती बाधित होण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे लहान मुलेही बाधित झाली, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले. लहान मुलांचे प्रमाण जास्त आढळल्याने मुलांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुुलांत आजाराचे प्रमाण कमी : प्रदीप व्यास सहा महिन्यांतील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आलेला नाही. बाधितांत १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण राज्यात मेमध्ये ०.०७% आहे. मुुलांत आजाराचे प्रमाण कमी आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचा अंदाज असल्याने टास्क फोर्स स्थापन केला असून, पायाभूत सुविधांची पूर्वतयारी सुरू असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.बाधित मुलांमध्ये दहा वर्षांखालील मुलांचे प्रमाण हे केवळ साडेतीन टक्के आहे, तर अकरा ते अठरा वयोगटाचे प्रमाण आठ टक्के आहे.  त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये. प्रत्येकाने काळजी मात्र घ्यावी.    - डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी मे महिन्यात बाधित मुले ० ते १ वर्षे     ८९१ ते १०    ३,०८१ ११ ते १८    ६,८५५एकूण    १०,०२५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या