मुंबई : कोरोनामुक्त होणाºया रुग्णांच्या संख्येने सोमवारी उच्चांक गाठला. एका दिवसात तब्बल ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत बºया झालेल्या रुग्णांची संख्या ८ हजार ४३७ झाली आहे, तर दिवसभरात २ हजार ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णांची संख्या ३५ हजार ५८ झाली आहे.सोमवारी दिवसभरात ५१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यात ३५ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. ५१ मृत्यूंमध्ये २१ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत, तर १९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ११ जण ४० वर्षांखालील आहेत. या ५१ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
कोविड-१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १२४९ झाली आहे. एकूण मृतांमध्ये मुंबईमध्ये २३, नवी मुंबईमध्ये ८, पुण्यात ८, जळगावमध्ये ३, औरंगाबाद शहरात २, अहमदनगर जिल्ह्यात २, नागपूर शहरात २, भिवंडीत १ तर पालघरमधील एकाचा समावेश आहे. याशिवाय बिहार राज्यातील एकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या २,८२,१९४ नमुन्यांपैकी २,४७,१०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर ३५,०५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांमध्ये इलायझा पद्धतीने तपासण्या करण्यात आल्या. या जिल्ह्यामध्ये रॅन्डम पद्धतीने निवडलेल्या १० समूहांतील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात येणार आहे. कोरोना प्रसाराची व्याप्ती समजण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.गावाला जायचे...अथक प्रयत्न केल्यानंतर भोपाळमधील या मायलेकरांना अखेर गावी जाण्याची (उधमपूर , जम्मू-काश्मीर) संधी मिळाली. गावाच्या ओढीने थेट भोपाळमधील हबिबगंज रेल्वेस्टेशनवर पोहोचलेल्या या मायलेकांना वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागले.राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या1681कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,०४१ सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी60.47लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले असून सध्या राज्यात ३,६६,२४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये, तर १८,६७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.