शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

CoronaVirus News: राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा; नवा साठा १७ एप्रिलपर्यंत मिळणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 07:33 IST

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे बोललं जात आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक जिल्ह्यांत रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे.राज्यात मुंबई, ठाणे, अंबरनाथ, पुणे, नांदेड , लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आणि नाशिकमध्ये पुन्हा रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रुग्ण, डॉक्टर, हॉस्पिटलसह सरकारलाही या इंजेक्शनसाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. राज्यात सध्या ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असून नवीन साठा १७ एप्रिलपर्यंत उपलब्ध होणार आहे, यावेळी ७० हजार इंजेक्शन्स मिळणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.काही खासगी डॉक्टर रुग्ण दवाखान्यात दाखल होताच त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन देतात. नियमाप्रमाणे एका रुग्णाला फक्त ६ इंजेक्शन द्यायचे असतात. इंजेक्शनचा साठा लक्षात घेता ज्यांना आवश्यकता आहे अशाच रुग्णांना डॉक्टरांनी इंजेक्शन द्यावे, इतरांसाठी या इंजेक्शनचा वापर करण्यात येऊ नये,  अशा सूचनाही यासंदर्भात  संबंधित सर्व डॉक्टरांना देण्यात येणार आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.किंमत नियंत्रणात; १,२०० ते १,८०० रुपयांना उपलब्धमुंबई : राज्यात काेरोना पुन्हा वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेऊन ‘अन्न व औषध प्रशासना’ने कोरोनावर गुणकारी ठरणारे इंजेक्शन रेमडेसिवीरच्या किमती कमी करुन नियंत्रणात आणल्या आहेत. ४,५०० ते ५,४०० रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आता १,२०० ते १,८०० रुपयांना राज्यातील बहुतेक खासगी रुग्णालयात उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारनेही यापूर्वी जनहिताच्या दृष्टीने ‘औषध किंमती नियंत्रण आदेश २०१३’अंतर्गत राज्यांनी अधिकाराचा वापर करून किमती नियंत्रित करण्याचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने एपिडेमिक अ‍ॅक्ट १८७९ तसेच अन्य कायद्यांचा अवलंब करून रेमडेसिवीर इंजेक्शन मास्क, सिटी स्कॅन चाचणी, कोरोना चाचणी तसेच रुग्णालयातील बेडचे व उपचारांचे दर नियंत्रित केले आहेत....तर तक्रार कराऑक्सिजन, रेमडेसिवीर रुग्णास मिळत नसल्यास अथवा काळाबाजार होत असल्यास त्याची माहिती संबंधित अन्न व औषध कार्यालयाच्या जिल्हा कार्यालयास किंवा प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. त्यांना औषध मिळवून देण्यास निश्चित मदत केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या