शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

CoronaVirus News: दुसऱ्या लाटेचा इशारा महाराष्ट्रातून मिळाला होता, पण...; समोर आली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 09:55 IST

CoronaVirus News: तीन महिन्यांत राज्यातील रुग्ण संख्या ४० टक्क्यांनी घटली

- हरीश गुप्तानवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचे संकेत फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातून मिळाले होते. तथापि, तेव्हा त्याकडे तज्ज्ञ अथवा सरकार यापैकी कोणीच लक्ष दिले नाही, असे हाती आलेल्या आकडेवारीवरून आता समोर आले आहे.१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १,९४८ होती, तर देशातील एकूण रुग्णसंख्या ८,५७९ इतकी होती. ही संख्या तशी कमी असली तरी देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील संसर्गाचा प्रमाण तब्ब्ल २२ टक्के होते.  त्यामुळे संख्या कमी दिसत असली तरी ती फसवी होती. कोविड पुन्हा डोके वर काढत होता. १ मार्च रोजी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ६,३९७ झाली. देशाच्या रुग्णसंख्येच्या (१२,२७०) तुलनेत हे प्रमाण तब्बल ५२ टक्के होते. १ एप्रिलपर्यंत देश मोठ्या लाटेच्या विळख्यात सापडला होता. देशातील रुग्णंसख्या ६ पटीने वाढून ८१,३९८ झाली होती, तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ७ पटीने वाढून ४३,१८३ झाली होती. दिल्लीतील रुग्णसंख्या ३० दिवसांत १० पट, तर उत्तर प्रदेशातील रुग्णसंख्या तब्बल ३१ पट वाढली होती.

देशाच्या तुलनेत राज्यातील रुग्णसंख्या १२ टक्के१८ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ६८,६३७ आणि देशातील रुग्णसंख्या २,७४,९४४ झाली. हा महाराष्ट्रातील सर्वोच्च बिंदू होता; पण एकूण रुग्णांतील राज्याचे प्रमाण आता घटून २४.५६ टक्क्यांवर आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने घटू लागली. ६ मे रोजी भारतातील रुग्णसंख्या ४.१४ लाखांच्या सर्वोच्च बिंदूवर गेली, तेव्हा महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ६२,१९४ आणि प्रमाण १५ टक्के झाले. २८ मे रोजी महाराष्ट्र २०,७४० रुग्णांसह चौथ्या स्थानी आला. कर्नाटक (२२,८२३), केरळ (२२,३१८) आणि तामिळनाडू (३१,०७९) ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. देशाच्या तुलनेत राज्यांतील रुग्णसंख्या आता केवळ १२ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या