शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनामुळे अनाथ झालेल्या लेकरांच्या डोक्यावर सरकारी छत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 09:13 IST

बालगृहाने दिली तिला मायेची ऊब; तीन निराधार भावंडांचा होतोय सांभाळ

- यदु जोशीमुंबई :  नऊ वर्षांच्या देविकाच्या वडिलांचा कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यू झाला. या धक्क्याने तिच्या आईने आत्महत्या केली. निराधार झालेल्या देविकाला पुणे जिल्ह्यातील मावळच्या बालगृहात दाखल करण्यात आले. आईच्या मायेने बालगृहातील कर्मचारी आता तिचा सांभाळ करीत आहेत.महिला व बालविकास विभागाच्या राज्यभरातील बालगृहांमध्ये सध्या कोरोनाने आई-वडिलांचे छत्र हरपलेली बालके दाखल होत आहेत. आभाळच फाटलेल्या या निरागस बालकांना हक्काचे छत मिळाले आहे. १८ एप्रिल २०२१ रोजी नाशिकच्या रेल्वेस्थानकात एक व्यक्ती दोन वर्षांच्या बालिकेसह बसलेली रेल्वे पोलिसांनी बघितली. त्यांनी चाइल्ड लाइनशी संपर्क केला, तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना कल्पना दिली. दोन वर्षांच्या त्या बालिकेचे वडील कुठे आहेत याची माहिती नाही, तिची आई टीबी अन् कोरोनावरील उपचारात दगावली.  पोलीस, चाइल्ड लाइनच्या माध्यमातून तिला बालगृहात दाखल केले गेले. ‘आचल’ला मायेचा पदर मिळाला.नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एका गावात साधारण १४, १५, १६ वयाची अशी तीन भावंडं.. चंचल, रूपल, अक्षय.. गेल्या वर्षी कोरोनाने आई गेली, त्या दु:खातून कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करीत असताना एप्रिल २०२१ मध्ये ताप आला आणि पुढचे उपचार होण्याआधी वडिलांवरही काळाने घाला घातला. तातडीची मदत म्हणून या मुलांना जिल्हा बालसंरक्षण कक्षाने प्रथम अन्नधान्य देऊ केले. हलाखीची परिस्थिती, तसेच २ मुलींची सुरक्षितता यामुळे आत्या, काका यांनी संगोपनास स्पष्ट नकार दिला. या मुलांना बालगृहात दाखल करण्यात आले. साधारण कळत्या वयाच्या या मुलांच्या मनावर मोठा आघात झाला असल्याने त्यांचे समुपदेशन करण्यात आले. आता आम्ही इथे राहू, शिक्षण पूर्ण करू असे सांगत या मुलांनी इयत्ता दहावी, बारावीचा अभ्यास सुरू ठेवला आहे.पुण्याच्या हवेली तालुक्यातील कविता (१०), सानिका (१३) या मुलींच्या आईचे चार वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. वडील डॉक्टर. कोरोच्या पहिल्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला. या मुली कोरोना पॉझिटिव्ह होत्या, त्यांचे उपचार पूर्ण झाल्यावर दोन्ही बहिणींना महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या बालगृहात दाखल करण्यात आले. बालगृहात दाखल झाल्यानंतर इयत्ता पाचवी आणि आठवी उत्तीर्ण होत या मुली पुढच्या इयत्तेत गेल्या आहेत. चित्रकलेत दोघींना विशेष रस आहे. बालगृहात त्यांची ही कला जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.पालक दगावल्याने जळगावला बालगृहात दाखल करतानाच १४ वर्षे वयाच्या मूकबधिर मुलाचा हात फ्रॅक्चर होता. उपचारानंतर पुन्हा बालकाला बालगृहात आणण्यात आले.   (बालकांची नावे बदलली आहेत.)दु:खी झालेल्या आनंदीला आश्रयबुलडाण्याच्या आनंदीची दैव घेत असलेली परीक्षा दुर्दैवी आहे. ती वर्षाची असताना ओडिशामध्ये वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. तिच्यासह आई मुंबईला आजी-आजोबांकडे आले. नंतर कुटुंब बुलडाण्याला स्थायिक झालं. २०१९ मध्ये शिपिंग कंपनीत नोकरी मिळाल्याने आईने तिला आजी-आजोबांकडे ठेवले. डिसेंबर २०२० मधे तिच्या आईचा कोरोनाने मृत्यू झाला. आनंदी १२, आजोबा ७३ वर्षांचे, तर आजी ६२ वर्षांची. आजी पतसंस्थेत एजंट आहे. आता राज्य सरकार अनाथांसाठी आणत असलेल्या योजनेत सामावून घेत या मुलीला, वृद्ध आजी-आजोबांना आधार मिळणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या