शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : "पोलिसांसह केशकर्तन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 05:18 IST

कायद्याचे उल्लंघन असून बोराडे यांच्यासह डॉक्टर आणि पोलिसांवरही कारवाई करावी अशी मागणी सलून ब्यूटी पार्लर असोसिएशनने केली.

मुंबई : लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्यात आले तरी सलून चालकांना व्यवसायास परवानगी मिळालेली नाही. तरीही नियमांचे उल्लंघन करून डोंगरी परिसरात संतोष बोराडे हे पोलीस आणि डॉक्टरांचे केशकर्तन करत आहेत. हे कायद्याचे उल्लंघन असून बोराडे यांच्यासह डॉक्टर आणि पोलिसांवरही कारवाई करावी अशी मागणी सलून ब्यूटी पार्लर असोसिएशनने केली. यासंदर्भात मंगळवारी संघटनेची बैठक होणार आहे.मुंबई सलून ब्यूटी पार्लर असोसिएशनचे सचिव प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या नियमानुसार, सलून बंदच आहेत. त्यामुळे अनेक सलूनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.पुण्यात ज्यांनी सलून सुरू केले त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र, डोंगरी येथे संतोष बोराडे यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचे केशकर्तन आणि दाढी केली. मास्कही वापरले नव्हते. ही पोलिसांची सेवा असली तरी सलून चालविण्यास परवानगी नसतानाअसे केशकर्तन करणे नियमविरोधात आहे. तसेच यावेळी बोराडे यांनीकिट घातले नाही ते धोकादायकआहे. याप्रकरणी पोलीस, डॉक्टर यांच्यासह बोराडे यांच्यावरकारवाई करावी अशी आमची मागणी आहे.सोयीने परवानगी आहे का?मुंबईतील अनेक स्मशानभूमीत मृत्यूनंतरचे क्रियाकर्म केले जात आहे. पण सलून सुरू करण्यास परवानगी नाही. आपल्या गरजेनुसार नियम आहेत का? हा दुटप्पीपणा आहे, असे प्रकाश चव्हाण म्हणाले.>सहा सलूनचालकांचे आत्महत्येचे पाऊलराज्यात सलून बंद असल्याने सलून चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सहा जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. या सलूनचालकांच्या कुटुंबातील सदस्यांना १५ लाखांचे पॅकेज जाहीर करा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.