शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 03:35 IST

परभणी आणि नांदेडात गुन्हा दाखल, बार्शीत औषध दुकान सील

परभणी/नांदेड/सोलापूर : राज्यभरात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू झाला आहे. रेमडेसिवीरच्या मूळ किमतीपेक्षा जादा दराने या इंजेक्शनची विक्री केली जात आहे. या प्रकरणी राज्यात ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली असून परभणी, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परभणीत बसस्थानक परिसरातील एका औषधी दुकानात रेमडेसिवीर या इंजेक्शनची जादा दराने विक्री होत असल्याने महसूल व अन्न औषधाच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणात नवा मोंढा पोलीस ठाण्यात औषध विक्रेत्यासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. ४ हजार ८०० रुपये किमतीचे इंजेक्शन ६ हजार रुपयांपर्यंत विक्री केले जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.  नांदेडमध्येही रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून केल्या जात होत्या. अखेर बुधवारी शहरातील शिवाजीनगर भागातील डॉक्टर लाइन परिसरात चढ्या दराने रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. वीरभद्र संगप्पा स्वामी, बाबाराव दिगाकंद पडोळे, बालाजी भानुदास धोंडे आणि विश्वजीत दिगंबर कांबळे उर्फ बारडकर अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३६ हजार ४०० रुपये मूळ किंमत असलेली ७ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली.  सोलापूर जिल्ह्यात स्टिंग ऑपरेशन सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतही काही मेडिकल दुकानांतून या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे एका स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले आहे. शहरातील तुळशीराम रोडवरील विक्रांत शहा यांच्या रुग्णालयातील मेडिकलमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजन ठक्कर यांनी व्हिडिओतून यासंदर्भात माहिती दिली. या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने या मेडिकलला भेट देऊन पुढील आदेश येईपर्यंत दुकान बंद करण्याची नोटीस दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या