शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ऑनलाइन शिक्षणावरील बंदी कोरोनापेक्षाही भयंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 05:16 IST

मुलांना ऑनलाइन लर्निंग द्यायचे की नाही, हा निर्णय सर्वस्वी पालकांवर सोडावा, असे मत मोहिमेअंतर्गत पालकांनी नोंदविले.

मुंबई : मुलांच्या ऑनलाइन शिक्षणावर बंदी घालणे कोरोनापेक्षाही भयंकर आहे, असे मत शैक्षणिक संस्थांनी विशेषत: पालकांनी राबविलेल्या #राईट टू लर्न या टिष्ट्वटर मोहिमेत व्यक्त करण्यात आले. मुलांना ऑनलाइन लर्निंग द्यायचे की नाही, हा निर्णय सर्वस्वी पालकांवर सोडावा, असे मत मोहिमेअंतर्गत पालकांनी नोंदविले.पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या मुलांना आॅनलाइन शिक्षण न देण्याच्या मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने दिल्या. असेच काहीसे निर्देश मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यातही देण्यात आले. याविरोधात रविवारी दुपारी २ ते ६ च्या दरम्यान पालक, फर्स्ट मॉम क्लबसारख्या स्वयंसेवी संस्था, शिक्षणतज्ज्ञांनी #राईटटू लर्न म्हणजे शिक्षणाचा अधिकार ही टिष्ट्वटर मोहीम राबविली. याअंतर्गत तब्बल ३८ हजार ३०० टिष्ट्वट्स करण्यात आले.देशभर राबविलेल्या या मोहिमेत टिष्ट्वट करण्यात बंगळुरू पहिल्या क्रमांकावर तर मुंबई पाचव्या स्थानावर राहिले. युनिव्हर्स आॅफ मॉम्स, मॉम्स फर्स्ट क्लब, इंदोर मदर्स अशा पालकांच्या ग्रुप्सने, मेम्बर्स आॅफ इंटरनॅशनल स्कूल्स असोसिएशन, अरली चाइल्डहूड असोसिएशन अशा शिक्षक, खासगी संस्थांच्या ग्रुप्सने आपल्या प्रतिक्रिया, विविध फोटो या टिष्ट्वटर मोहिमेत पोस्ट केले.मुले कोरोना काळात शाळा व त्या वातावरणापासून दूर राहिली तर त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, भावनिक तसेच मानसिक नुकसान होईल. शिवाय अनेक शिक्षकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील, असे मत एसीएच्या अध्यक्षा स्वाती पोपट वत्स यांनी व्यक्त केले.शिक्षक, शाळांना आॅनलाइन शिक्षण अधिक प्रभावी कसे ठरेल, याचे प्रशिक्षण शिक्षण विभागाने द्यावे, पालकांच्या आर्थिक स्तराचा विचार व्हावा, अशी प्रतिक्रिया फर्स्ट मॉम क्लब संस्थेने नोंदवली. तर, शिक्षणाची पहिली ५ वर्षे महत्त्वाची असतात. ती वाया गेल्यास देशाचे भविष्य धोक्यात येईल. कोरानाच्या भीतीने पुढील काही महिन्ये पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसतील त्यामुळे आॅनलाइन शिक्षण आवश्यक असल्याची प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ फातिमा आगरकर यांनी दिली.>शिक्षणातील सामाजिक न्याय जोपासणे गरजेचेकोरोना महामारीच्या काळात शिक्षणातील सामाजिक न्याय जोपासणे, सर्वांना आॅनलाइन शिक्षण देणे हा पर्याय असायला हवा. त्यामुळे पालक, तज्जांची मते लक्षात घेऊन त्यानुसार शिक्षक विभाग त्यांच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक ते बदल करतील, अशी अपेक्षा शिक्षक, शिक्षकतज्ज्ञ फ्रान्सिस जोसेफ यांनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या