शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: बच्चू कडूंनी अनुभवलेले तीन दिवस कोरोनाचे; वाचून अंगावर काटा येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 16:40 IST

Coronavirus कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानं बच्चू कडू होम क्वॉरेंटाईन

अमरावती: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाची लक्षणं आढळून आल्यास तातडीनं रुग्णालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं जात आहे. घराबाहेर पडणं टाळा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, असं आवाहन पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी केलं आहे. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील हेच आवाहन केलं आहे. काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांचा घसा खवखवत होता. थोडा खोकलाही होता. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. यानंतर काही दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या दरम्यानची मनाची घालमेल बच्चू कडूंनी फेसबुकच्या माध्यमातून मांडली आहे.२३ तारखेला बच्चू कडूंचा घसा थोडा खवखवत होता. खोकलादेखील होता. सिव्हिल सर्जनशी बोलून त्यांनी औषधं घेतली आणि कामाला लागले. मात्र मनात विचारचक्र सुरूच होतं. या दिवसांत बच्चू कडू यांचा मुलगा देवा आणि पत्नी नयना यांनी त्यांना घरी राहण्यास सांगितलं. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहाता कडू कामाला लागले. यानंतर कडू यांची तपासणी झाली. त्याचे अहवाल काहीसे संशयास्पद असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. वैद्यकीय अहवालाची माहिती समजताच बच्चू कडूंना काळजी वाटू लागली. मग त्यांनी घरात वेगळं राहण्यास सुरुवात केली. पत्नी आणि मुलगा घराबाहेर पडू नका, असं अनेकदा सांगत असूनही आपण त्यांचं ऐकलं नाही, यामुळे त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. आपल्यामुळे कुटुंबीयांना, इतर लोकांना कोरोना झाल्यास काय होईल, आपण गेल्या काही दिवसांत शेकडो लोकांच्या भेटीगाठी घेतल्यानं आपल्यामुळे किती जणांचा जीव जाईल, या चिंतेनं झोपही लागली नाही, असं बच्चू यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. घरातच वेगळं राहणाऱ्या बच्चू कडू यांचं काम फोनच्या माध्यमातून सुरू होतं. पण कोरोनाचा तपासणी अहवाल कसा येईल, तो पॉझिटिव्ह आला तर काय, आपल्यामुळे अनेकांचं जीव गेले तर काय, असं विचारांचं काहूर त्यांच्या मनात माजलं होतं. २९ तारखेला कडू यांची पुन्हा तपासणी झाली. त्याचा अहवाल दोन दिवसांत मिळणार होता. हे दोन दिवस कडू यांच्यासाठी अतिशय होते. या दिवसात मरण डोळ्यासमोर पाहिल्याची भावना त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.बच्चू कडू यांचा कोरोनाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यावेळी पत्नीला मी निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद झाला होता, असं बच्चू कडूंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. आपण ३ दिवस स्वत:चा मृत्यू पाहिल्याचं त्यांनी म्हटलं. आपल्यामुळे आपला परिवार, गाव, देश अडचणीत येऊ नये. यासाठी घरीच राहण्याचं अतिशय कळकळीचं आवाहन बच्चू कडूंनी केलं आहे. नियम पाळा, कोरोना टाळा, असा मंत्र त्यांनी पोस्टच्या शेवटी दिला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याBacchu Kaduबच्चू कडू