शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Maharashtra : राज्यात ६ ऑक्टोबरनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू, एकूण २४,९४८ नव्या रुग्णांची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 23:07 IST

राज्यात नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक.

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या (Coronavirus Cases) कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी राज्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली. ६ ऑक्टोंबर २०२१ नंतर २८ जानेवारी रोजी सर्वाधिक १०३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे गेल्या चोवीस तासांत राज्यात २४,९४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यापूर्वीच्या दिवसाच्या तुलनेत ही संख्या थोडी अधिक आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यात १०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर राज्यात पॉझिटिव्हीटी रेट हा १०.३२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गेल्य़ा चोवीस तासांमध्ये राज्यात ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) ११० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यानंतर राज्यातील आतापर्यंत ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३०४० इतकी झाली आहे. एकीकडे राज्यात १०३ मृत्यूंची नोंद झाली असली तरी गेल्या चोवीस तासांमध्ये ४५,६४८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात सध्या २ लाख ६६ हजार ५८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत दिलासादायक चित्रमुंबईत गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली. गेल्या चोवीस तासांत मुंबईत १३१२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४९९० रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मुंबईत सध्या १४ हजार ३४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता २५९ दिवस इतका झालाय.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOmicron Variantओमायक्रॉनMumbaiमुंबई