शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus राज्यात ३० लाख लीटर दूध वितरणाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 05:47 IST

‘लॉकडाउन’चा परिणाम : सरकारने मनावर घेतल्यास नुकसान टाळणे शक्य

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : संकलनास फारशा अडचणी नसल्या तरी वितरणास येत असलेल्या अडचणींमुळे राज्यात सध्या रोज किमान ३० लाख लीटर दूध वितरण होत नाही. त्याचा फटका दूध संघांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना बसत आहे.राज्यभरात दुधाला प्रचंड मागणी आहे. कारण लोक घरी बसून आहेत व त्यांना चहासह दुधाची गरज आहे. भाजीपाला विकता आला नाही तर तो मातीत घालावा लागतो, परंतु दुधाचे तसे नाही. या उद्योगाला प्रक्रिया उद्योगाचे पाठबळ आहे. त्यामुळे संकलन झालेले दूध शिल्लक राहिले तर त्यापासून पावडर करता येते. सध्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) प्रतिदिन ३ लाख लिटर दुधाची पावडर करीत आहे. ‘गोकुळ’कडे सोमवारपासून राज्य शासनाकडून २ लाख लिटर दूध पावडर करण्यासाठी पुरवले जात आहे. अन्य तीन संघांनाही हे दूध पुरविण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात खासगी दूध संघांकडे पावडर प्लान्ट जास्त आहेत व त्यांनी ते बंद ठेवले आहेत. त्यांनी संकलनच बंद ठेवले आहे. ‘महानंदा’कडे स्वत:ची पावडर करायची काही यंत्रणा नाही. जो होता तो ३० टन क्षमतेचा प्लान्ट त्यांनी खासगी उद्योगाला चालवायला दिला आहे. शासनाचा मिरज येथे २० लाख टन व उदगीर (जि. लातूर) येथे ११ लाख टनांची क्षमता असलेला पावडर प्लान्ट आहे; परंतु हे दोन्ही प्लान्ट बंद आहेत. त्यामुळे शासन आता शेतकऱ्यांकडून घेणार असलेले १० लाख लिटर दूध पावडर करण्यासाठी सहकारी दूध संघांकडे पाठविण्याची वेळ आली आहे.वितरण कमी का झाले?चहा टपरी बंद, मिठाई उद्योग बंद, किराणा दुकान, शॉपीज्मधील विक्री थांबली, वितरण करणारी बिहार, उत्तर प्रदेशातील मुले गावी गेली. (मुख्यत: मुंबईत)दूध खरेदी दरातही फटकाम्हशीच्या दुधाला मागणी आहे व गोकुळच त्याचा पुरवठा करणारा मुख्य संघ असल्याने दुधाच्या खरेदी दरात कपात करण्यात आलेली नाही. परंतु गाईच्या दुधात लिटरला ५ रुपये दर कमी दिला जात आहे. गोकुळने २ रुपये कपात केली आहे. दर कमी करूनही अनेक सहकारी व खासगी संघही शेतकºयांचे दूध स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाcorona virusकोरोना वायरस बातम्या