शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Coronavirus : कोरोना स्वॅब तपासणीसाठी राज्यात आणखी १३ लॅब

By अतुल कुलकर्णी | Updated: March 25, 2020 05:28 IST

Coronavirus : कोरोनाची साथ सुरु होण्याच्या दरम्यान मुंबईत कस्तुरबा रुग्णालयामध्ये रोज ५० रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासण्या होत होत्या. त्या आता २०० पर्यंत गेल्या आहेत. इंदिरा गांधी हॉस्पिटल नागपूर येथे ४० वरुन १०० आणि एनआयव्ही पुणे येथे १०० तपासण्या होत आहेत.

- अतुल कुलकर्णीमुंबई : कोरोनाची लागण सुरु झाली तेव्हा बाधितांच्या ‘स्वॅब’ची तपासणी राज्यात तीन लॅबमध्ये होत होती. ती संख्या आता ७ वर गेली आहे. आणखी ८ सरकारी आणि ५ खाजगी अशा १३ लॅब टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत. लॅबचे रिपोर्ट जसे येऊ लागतील तसे पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडाही वाढत जाईल, अशी माहिती आहे.कोरोनाची साथ सुरु होण्याच्या दरम्यान मुंबईत कस्तुरबा रुग्णालयामध्ये रोज ५० रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासण्या होत होत्या. त्या आता २०० पर्यंत गेल्या आहेत. इंदिरा गांधी हॉस्पिटल नागपूर येथे ४० वरुन १०० आणि एनआयव्ही पुणे येथे १०० तपासण्या होत आहेत.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्लीत इंडियन काऊन्सील मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे राज्यात आता चार नवीन सरकारी लॅब सुरु झाल्या आहेत. ज्यात मुंबईत केईएम (२००), जेजे हॉस्पीटल (१००), हाफकीन इन्स्टीट्यूट (१००) आणि पुण्याच्या बी .जे. मेडीकल कॉलेज (१००) येथे मिळून रोज ५०० सॅम्पल तपासण्याचे काम सुरु झाल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.लहाने म्हणाले, २७ तारखेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथील लॅब सुरु होईल. तसेच नागपूर, अकोला, धुळे, सोलापूर, मीरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लॅब ३१ एप्रिल रोजी तर लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लॅब ७ एप्रिल रोजी कार्यान्वित होईल. या सात ठिकाणी प्रत्येकी १०० असे एकूण ७०० सॅम्पल रोज तपासले जातील.केंद्र सरकारने मुंबईत पाच खाजगी लॅबना परवानगी दिली आहे. थायरोकेअर (४००), सबरबन डायग्नोस्टीक (२००), मेट्रोपॉलिश हेल्थ केअर (३५०), एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर (४००) आणि एसआरएल लॅब (४००) सॅम्पल असे एकूण १७५० सॅम्पल तपासले जातील. या लॅबही एक-दोन दिवसात पूर्ण क्षमतेने सुरु होतील. कोरोनाचा आजार ‘अधिसूचित आजार’ म्हणून नोंदवलेला आहे, त्यामुळे या खाजगी लॅबना तपासल्या जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. या तपासण्या त्यांनी शक्यतो मोफत कराव्यात. व शक्य नसेल तर स्क्रीनींगचे १५०० रुपये आणि कर्न्फमेटरीचे ३००० असे ४५०० रुपयांपेक्षा जास्त पैसे त्यांना घेता येणार नाहीत, असेही डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.हाफकिनमध्ये २ लॅब- जेव्हा कोरोनाची लागण सुरु झाली त्याचवेळी हाफकिनचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी येथे लॅब सुरु करता येईल का याची चाचपणी केली. अवघ्या आठ दिवसात येथे काम करणारे सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञांनी युध्दपातळीवर काम करुन दोन लॅब सुरु केल्या. डॉ. राजेश देशमुख म्हणाले,- आमच्याकडे एक लॅब सोमवारी सुरु झाली. बर्ड फ्ल्यूच्यावेळी तयार केलेली एक लॅब पडून होती. ती मंगळवारपासून पूर्णक्षमतेने कार्यान्वित होईल. या दोन्ही लॅबमध्ये मिळून आम्ही २०० सॅम्पल तपासू. आम्हाला सॅम्पल कस्तुरबा हॉस्पिटलमधून मिळतील, तीन शिफ्टमध्ये या दोन्ही लॅब चालवण्याचा प्रयत्न आमचे शास्त्रज्ञ करत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस