शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कोरोनाचा काळ! स्तनदा मातांसाठी स्तनपानाची मार्गदर्शक तत्त्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 05:22 IST

बाळंतपण झाल्यावर आई आणि बाळाला एकत्र ठेवता येईल. तसेच लगेचच स्तनपान सुरू करता येईल.

- अमोल अन्नदाते,(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

कुठलीही लक्षणे नसलेल्या व कोरोना नसलेल्या आईने नियमित जसे आपण स्तनपान करतो तसे मास्क न घालता स्तनपान केले तरी चालेल. फक्त बाळाला हाताळताना आधी हात धुणे व मगच बाळाला जवळ घेणे. स्तनदा मातांना इतरांपासून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे.

आई कोरोना संशयित / कोरोनाबाधित असल्यास व लक्षणविरहीत / सौम्य लक्षणे असल्यास-बाळांतपण झाल्यावर आई आणि बाळाला एकत्र ठेवता येईल. तसेच लगेचच स्तनपान सुरू करता येईल. तिने नेहमी करतात तसे स्तनपान सुरू ठेवावे. आईच्या दुधातून कोरोनाची बाधा होत नाही. स्तनपान करताना आईने मास्क वापरावा. दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना मात्र मास्क वापरू नये. शक्यतो बाळ व आईचा एखाद्या मदतनिसाशिवाय इतरांशी संपर्क नको. आईला मदत करणाऱ्या मदतनिसाने मास्क, ग्लोव्हज, मेडिकल गाऊन वापरावा व आईशी कमीत कमी संपर्क ठेवावा.आईने दर सहा ते आठ तासांनी मास्क बदलावा. आईला कोरोना असला तरी तिच्या दुधातून बाळाला संरक्षण देणाºया अँटीबॉडीज जातात.बाळाला दर वेळेला स्तनपानासाठी घेताना २० सेकंद तरी साबणाने हात धुवावे व हँड सॅनिटायजरचा वापर करावा.आई कोरोनाबाधित असून तीव्र लक्षणे असल्यास -आईला खोकल्याचा त्रास असल्यास ही ती मास्कचा वापर करून कोणाच्या तरी मदतीने स्तनपान चालू ठेवू शकते. पण अशा स्थितीत आईला स्तनपान चालू ठेवणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे अशा वेळी परिस्थितीचा अंदाज घेऊन बालरोगतज्ज्ञ, आई व नातेवाईकांनी चर्चा करून दोनपैकी एक निर्णय घ्यावा. पहिला पर्याय आईने वाटीमध्ये दूध काढून द्यावे व ते इतराने बाळाला वाटी चमचाने पाजावे किंवा आईला सोयीस्कर काय आहे व तिची स्थिती बघून पावडरचे दूध अपवादात्मक स्थितीत वापरता येईल. नवजातशिशू व लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी तो सौम्य किंवा लक्षणविरहीत असतो. म्हणून त्यांना धोका नाही. तसेच त्यांच्याकडून इतरांना कोरोन संसर्ग होण्याचा धोका खूप कमी आहे, पण यावर अजून संशोधन आवश्यक आहे.वरील सर्व निर्देश हे जागतिक आरोग्य संघटनेने दिले असले तरी पाश्चिमात्य देशांमध्ये तसेच भारतातील काही नवजात शिशूतज्ज्ञांच्या मते आई कोरोनाबाधित असल्यास स्तनपानाचा निर्णय हा पालकांशी चर्चा करून मिळून घेतला जावा. अशा प्रकारे सर्व जोखीम सांगून पालक व डॉक्टरांनी चर्चा करून एकत्रित निर्णय घेतला जावा, असे पाश्चिमात्य देशातील वैद्यकीय जर्नल सांगतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpregnant womanगर्भवती महिला