शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

कोरोनानं पुन्हा वाढवलं मुंबईचं टेन्शन, जंबो कोविड सेंटर्सना अलर्ट राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 21:55 IST

Corona Virus : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोजच्या रोज सरासरी एक हजाराहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. आता राज्यात ओमायक्रॉनचे (Omicron) सब-व्हेरिअंट BA.4 आणि BA.5 चे तीन रुग्ण समोर आले आहेत. यातच सरकारने जनतेला मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर, परिस्थिती पाहता, पुन्हा एकदा मुंबईमध्ये काही जंबो सेंटर्स अॅक्टिव्ह केले जात आहेत. तसेच या सेंटर्सना अलर्ट मोडवर राहण्यासही सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आकडेवारीसंदर्भात बोलायचे झाल्यास, सोमवारी महाराष्ट्रात 1885 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी मुंबईत कोरोनाचे तब्बल 1,118 नवे रुग्ण समोर आले आहेत. 

BA.4 आणि BA.5 चे तिन्ही रुग्ण ठणठणीत -भारतात आलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉनने मोठे नुकसान केले होते. यामुळे, राज्यात ओमायक्रॉनच्या सब व्हेरिअंटचे रुग्ण आढळल्याने सरकार अलर्ट झाले आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, BA.4 आणि BA.5 चे तिन्ही रुग्ण होम आयसोलेशनमध्येच ठणठणीत झाले आहेत. 

जंबो सेंटर्स अॅक्टिव्ह - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबईत जंबो सेंटर्स तयार करण्यात आले होते. यामुळे जनतेला मोठा दिलासाही मिळाला होता. आता मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतानाच, पुन्हा एकदा या जंबो सेंटर्सना अॅक्टिव्ह होण्यास सांगण्यात आले आहे.

ऑक्सिजन टँकही भरण्यात आले - मुंबईतील मालाड भागातील जम्बो कोविड सेंटरमध्ये तयारीही सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना मालाड कोविड सेंटरचे डीन म्हणाले, आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्हाला अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आले आहे. आम्ही ऑक्सिजन सिलिंडर भरले आहेत. जर परिस्थिती बिघडली, तर आम्ही 2 दिवसांत लोकांच्या मदतीसाठी पूर्णपणे तयार राहू. सध्या आमच्याकडे कोविड वॉर रूमसाठी 11 डॉक्टरही आहेत. तसेच, परिस्थिती बिघडलीच तर काही डॉक्टरांना स्टँडबाय देखील ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस