शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : महाराष्‍ट्रात कोरोनाचा स्फोट, एकाच दिवसात आढळले 4,024 नवे रुग्ण, मुंबईत 5 महिन्यांचा रेकॉर्ड तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 23:03 IST

राज्यात बुधवारी तब्बल 4,024 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. मुंबईचा विचार करता, येथे तब्बल 5 महिन्यांनंतर, आज (बुधवार) विक्रमी कोरोना रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली आहे. 

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे टेन्शन वाढवायला सुरुवात केली आहे. राज्यात बुधवारी तब्बल 4,024 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. कालच्या तुलनेत हा आकडा तब्बल 36 टक्क्यांनी अधिक असून, या काळात दोन संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईचा विचार करता, येथे तब्बल 5 महिन्यांनंतर, आज (बुधवार) विक्रमी कोरोना रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली आहे. 

मुंबईत 5 महिन्यांनंतर विक्रमी रुग्ण संख्येची नोंद -मुंबईमध्ये बुधवारी 2,293 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 23 जानेवारीनंतर एक दिवसात समोर आलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. यासंदर्भात स्वतः बीएमसी माहिती दिली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात बी. ए. 5 व्हेर‍िअंटचे संक्रमण झालेले चार नवे रुग्ण समोर आले आहेत. या संक्रमितांचे वय 19 ते 36 वर्षांच्या आत आहे. सध्या यांची प्रकृती स्थिर आहे.

महाराष्‍ट्रातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेत, आरोग्य विभाग तयारीला लागला आहे. बीएसमीकडून बीकेसी जंबो कोविड केअर सेंटरमध्ये मेडिकल स्टाफसह सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या शिवाय, मुंबईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणीही केली जात आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई