शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

कोरोना व्हायरस; राज्यात तिघे निरीक्षणाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 05:56 IST

सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने सोमवारी सायंकाळी एका प्रवाशाला पुणे येथील नायडू रुग्णालयात, तर एकाला चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुणे आणि मुंबई येथे तिघांना रुग्णालयात निरीक्षणासाठी दाखल केले आहे. आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ३९ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ३६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने सोमवारी सायंकाळी एका प्रवाशाला पुणे येथील नायडू रुग्णालयात, तर एकाला चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती केले. ३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असून उर्वरित दोघांचे प्रयोगशाळा अहवाल बुधवारपर्यंत मिळतील. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या तिघांपैकी दोघे पुणे येथील नायडू रुग्णालयात, तर एक मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत २५ हजार ७८२ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून आलेल्या एकूण १६७ प्रवाशांपैकी ८४ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.जेएनपीटी बंदरात चीनच्या जहाजातील ‘क्रू ’ मेंबर्सना उतरण्यास मनाईउरण : कोरोना व्हायरसने चीनमध्ये कहर माजविल्यानंतर खबरदारी म्हणून १५ जानेवारीनंतर चीनमधून येणाऱ्या जहाजातील ‘क्रू ’ मेंबर्सना जेएनपीटी बंदरात उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तपासणीत कोरोना व्हायरसबाधित एकही संशयित रुग्ण अद्यापही आढळून आलेला नाही, अशी माहिती जेएनपीटी बंदराचे डेप्युटी कॉन्झेवेटर कॅप्टन अमित कपूर यांनी दिली. यामुळे जेएनपीटी बंदरातील आयात-निर्यात व्यापारात फारसा परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मात्र, बंदरातील सर्वात मोठ्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनलवर कोरोना व्हायरसचा व्यापारावर परिणाम दिसून येत आहे. कारण बंदरात मालवाहू जहाजांची ये-जा रोडावल्याने बंदर सुनसान झाले आहे. मात्र, चीनमधून मालवाहू जहाजे नियमितपणे येत असल्याचा दावा बीएमसीटी बंंदराचे एचओडी अवधूत सावंत यांनी केला आहे. मात्र, कोरोना व्हायरसचा काहीसा परिणाम बीपीसीटीवर झाल्याचेही सावंत यांनी मान्य केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीन