शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

Corona Virus : कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलं; मुंबईत आढळले 2000 हून अधिक रुग्ण, अशी आहे राज्याची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 22:45 IST

याचबरोबर मुंबई शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी एकूण 24,825 बेड उपलब्ध आहेत. त्यांपैकी 652 बड सध्या उपचारासाठी वापरल्या जात आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहेत. शहरात गेल्या 24 तासात एकूण 2,087 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या एकूण संक्रमित रुग्णांपैकी 95 टक्के म्हणजे 1992 एवढ्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत.

याचबरोबर मुंबई शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी एकूण 24,825 बेड उपलब्ध आहेत. त्यांपैकी 652 बड सध्या उपचारासाठी वापरल्या जात आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, BMC ने आज एकूण 15,026 लोकांची कोरोना चाचणी केली. सध्या मुंबईत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97 टक्के एवढे आहे.

महाराष्ट्रात 4004 नवे रुग्ण - महाराष्ट्रासंदर्भात बोलायचे झाल्यास, येथे गेल्या 24 तासांत तब्बल 4004 एवढ्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यांपैकी 2,087 रुग्ण मुंबईतील आहेत. याच बरोबर, माध्यमांतील वृत्तांनुसार, राज्यात गेल्या 7 दिवसांत 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शनिवारी 3883 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

राजधानी दिल्लीत 1530 नवे रुग्ण -  राजधानी दिल्ली संदर्भात बोलायचे झाल्यास, येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. येथे सलग पाचव्या दिवशी एक हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. गेल्या 24 तासांत येथे 1530 रुग्णांची नोंद झाली आहे, तर तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट 8.41% एवढा आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबई