शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Corona Vaccine: कुठे तीन तर कुठे एकाच दिवसाचा लससाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 05:14 IST

Corona Vaccine Shortage: रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनसह राज्यात कोरोना लसींचाही प्रचंड तुटवडा पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनसह राज्यात कोरोना लसींचाही प्रचंड तुटवडा पडला आहे. मंगळवारी राज्यातील महापालिका क्षेत्रातील परिस्थितीचा अंदाज घेतला असता कुठे तीन दोन-तीन दिवसांचा तर कुठे फक्त बुधवारी दिवसभर पुरेल एवढाच साठा उपलब्ध आहे.

  ठाणे/नवी मुंबईठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ९१ हजार एवढा साठा शिल्लक आहे. शहरासाठी ५ लाख एवढी मागणी आहे. हा साठा पुढील २ ते ३ दिवस पुरेल. तर नवी मुंबईत ५५०० लसीचे डोस शिल्लक आहेत. रोज ७५०० डोसची गरज आहे. बुधवारी नवीन साठा उपलब्ध होईल. विदर्भअमरावतीत १८ एप्रिल रोजी साठा निरंक असल्याने १२५ केंद्रे बंद होती. त्याच दिवशी उशिरा २२,६४० लसी प्राप्त झाल्या. सोमवारी यापैकी दोन हजार लसी महापालिकेला व ५०० खासगी केंद्रांना देण्यात आल्या. सध्या १० हजार लसी शिल्लक आहेत.नागपूर शहरात मंगळवारी २० हजार डोस उपलब्ध होते. शहरात आतापर्यंत ४ लाख २८ हजार ८३८ लाभार्थींना देण्यात आला. पहिला डोस ३ लाख ८४ हजार ३६७ लाभार्थींना तर दुसरा डोस ४४ हजार ४७१ लाभार्थींना देण्यात आला.

 मराठवाडाऔरंगाबादेत सध्या ५ हजार लसींचा साठा असून तो दोन दिवस पुरेल. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ४४ हजार ५९६ डोस देण्यात आले आहेत. परभणीत लसीचाही तुटवडा आहे. ६ लाख ४८ हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या लसीचे ७ हजार डोस उपलब्ध आहेत. ही लस केवळ एक दिवस पुरेल एवढीच आहे.लातूरमध्ये सध्या १५ हजार डोस उपलब्ध आहेत. ती आठवडाभर पुरेल. आतापर्यंत २ लाख १०१ डोसचे लसीकरण झाले असून २२ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. नांदेड महानगरपालिकेकडे १० हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. शहरातील १० केंद्रावर लसीकरण सुरू असून दररोज साधारण १४०० लसीकरण होत आहे.

 पश्चिम महाराष्ट्रकोल्हापुरात लसीकरणासाठी १२ सेंटर्स सुरू आहेत. परंतु सध्या लसीचा साठा संपला आहे. प्रशासनाने जिल्हा परिषदेकडे ३० हजार डोसची मागणी दोन दिवसांपूर्वी केली आहे. पण लस उपलब्ध झालेली नाही. उत्तर महाराष्ट्रजळगावात सोमवारी १३ हजार लसीचे डोस प्राप्त झाले असून हे डोस तीन दिवस पुरतील. प्रशासनाकडून मागणी नोंदविण्यात आली असून आगामी दोन दिवसात आणखी डोस उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती आहे. धुळे पालिका क्षेत्रात ६००० लसींचा साठा उपलब्ध आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या