शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: कोविशिल्ड लसीच्या डोसचे नवे दर ठरले; रुग्णालयांना 150 ते 600 रुपयांत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 06:16 IST

केंद्र १५०, राज्य ४००, तर खासगी ६०० रुपये. देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी लवकरच सुरुवात होणार आहे. या टप्प्यासाठी  लसींचे उत्पादन वाढविण्याता यावे म्हणून सीरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक यांना ४५०० कोटींचे तातडीचे अर्थसाह्यही केंद्र सरकारने दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी येत्या १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्व व्यक्तींना लस देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले असतानाच कोविशिल्ड लसीचे निर्माते असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटने राज्य सरकारे तसेच खासगी रुग्णालयांना देण्यात येणाऱ्या लस मात्रांचे दर बुधवारी जाहीर केले. त्यानुसार राज्य सरकार व खासगी रुग्णालये यांना प्रतिडोस अनुक्रमे ४०० व ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. 

देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी लवकरच सुरुवात होणार आहे. या टप्प्यासाठी लसींचे उत्पादन वाढविण्याता यावे म्हणून सीरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक यांना ४५०० कोटींचे तातडीचे अर्थसाह्यही केंद्र सरकारने दिले. या सर्व पार्श्वभूमीवर सीरमने बुधवारी ट्विटरवर लसीचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार राज्य सरकारांना ४०० प्रतिडोस तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रतिडोस कोविशिल्ड देण्यात येईल. मात्र, केंद्र सरकारला १५० रुपये प्रतिडोस या दरानेच पुरवठा केला जाईल. दोन महिन्यांत लस उत्पादनाला वेग देण्यात येईल, असेही म्हटले आहे. 

केंद्राच्या धोरणानुसार सीरम व भारत बायोटेक यांच्याकडून उत्पादित होणाऱ्या लसींपैकी  ५० टक्के लसी केंद्रासाठी राखीव असतील तर उर्वरित ५० टक्के साठा राज्ये आणि खासगी रुग्णालये यांच्यासाठी राखीव असेल.

राज्यांचा नाराजीचा सूरn सीरमकडून केंद्राला अवघ्या १५० रुपयांना मात्र, राज्यांना ४०० तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना लस दिली जाणार असल्याने राज्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. n केंद्राला १५० रुपयांना लस विकूनही सीरमला नफा होत असेल तर तीच आम्ही ४०० रुपयांना घ्यावी, असा सवालही राज्यांनी केला आहे. n खासगी रुग्णालयांना जर लस ६०० रुपयांना विकली तर ही रुग्णालये लस लाभार्थ्यांकडून अधिक पैसे घेण्याची शक्यताही अनेकांनी बोलून दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राप्रमाणे राज्यांनाही त्याच किमतीत लस द्यावी, असा सूर उमटत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विचार करता कोविशिल्डचे भारतातील दर अत्यल्प आहेत. जगात इतरत्र लसीचे डोस भारतीय मूल्यात ७५० ते १५०० रुपये या दरम्यान दिले जात आहेत.     

- सीरम इन्स्टिट्यूट.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या