शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांत महाराष्ट्र पहिला - टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 08:00 IST

आजही लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणाऱ्यांत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई : देशाने गुरुवारी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटींचे लक्ष्य पूर्ण केले. यात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. राज्यात आतापर्यंत साडेनऊ कोटी लसीकरण झाले आहे. आजही लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणाऱ्यांत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.देशाने लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार केल्याच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे म्हणाले की, १५ ऑक्टोबरपर्यंत शंभर कोटींचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले होते. हे लक्ष्य आज पूर्ण करण्यात आले. शंभर कोटींचा टप्पा पार पडला. यात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. राज्यातील एकूण लसीकरणापैकी ६ कोटी ४० लाखजणांनी पहिला डोस घेतला आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या साधारण ३० टक्के असून, एकूण २ कोटी ९० लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांची राज्याची टक्केवारी देशात सर्वाधिक आहे, तर, सर्वाधिक पहिला डोस घेणाऱ्यांत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या अधिक असल्याने तिथे लसींचा आकडा तुलनेत जास्त होता, असेही राजेश टोपे म्हणाले. राष्ट्रीय लसीकरणात महाराष्ट्राची चांगली कामगिरी आहे. त्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे टोपे यांनी अभिनंदन केले.  जागतिक टक्केवारीत मागेच - मिलिंद देवरालसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबविणे सोपी गोष्ट नाही. पण आतापर्यंत केवळ २१ टक्के भारतीयांचेच पूर्ण लसीकरण झाले आहे. जागतिक टक्केवारी ३७ टक्के आहे. त्यामुळे आताच उत्सव साजरा करून महामारी संपल्याचा आभास निर्माण करता कामा नये, असे मिलिंद देवरा म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसRajesh Topeराजेश टोपे