शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : जून अखेरपासून राज्याला दर दिवसाला मिळणार तब्बल नऊ लाख लसींचे डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 07:46 IST

Corona Vaccination : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याला जून महिन्यात एकूण ७० लाख, तर जुलै महिन्यात एक कोटी लसींचे डोस मिळतील.

मुंबई : केंद्र शासनासोबत लसीच्या पुरवठ्याविषयी घेण्यात आलेल्या बैठकीत संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने सकारात्मक बाब समोर आली आहे. त्यानुसार, जून अखेरपासून राज्याला दर दिवसाला  तब्बल नऊ लाख लसींचे डोस पुरविण्यात येतील. कोव्हॅक्सिन, कोविशिल्डचे उत्पादन वाढविले आहे. स्पुतनिक लसही वितरणासाठी उपलब्ध झाली आहे.राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याला जून महिन्यात एकूण ७० लाख, तर जुलै महिन्यात एक कोटी लसींचे डोस मिळतील. लसींचा योग्य पुरवठा उपलब्ध झाल्यास दिवसाला १५ लाख जणांचे लसीकरणाचे लक्ष्य असल्याचे आराेग्य विभागाने नमूद केले. पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, राज्याला उपलब्ध होणाऱ्या एकूण पुरवठ्यापैकी १० टक्के लस मुंबईला मिळतील. गेल्या महिन्यात साठा कमी मिळाला होता, त्यामुळे आता अधिक लसींचा साठा देण्याची विनंती केली आहे.मे महिन्यात केंद्राने राज्याला ४०.६ लाख लसींचे डोस पुरविले. तर २५.१ लाख लसींचे डोस राज्याने खरेदी केले. ते १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केले होते, परंतु नंतर ४५ हून अधिक वय असणाऱ्यांनाही यातून लस देण्यात आली. राज्यातील खासगी व्यवस्थापनांनी ३२.३८ लाख लसींचे डोस मे महिन्यात खरेदी केले आहेत.

जागतिक निविदा काढून लस घेण्याचा निर्णय रद्द४५ हून अधिक वयाचे अतिजोखमीच्या गटातील असल्याने त्यांना पहिला डोस देण्यात येईल, त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील शासकीय-पालिका संस्थांमधील लसीकरण पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्य विभागाने सांगितले. जागतिक निविदा काढून लस घेण्याचा निर्णय तूर्त रद्द केल्याचे आरोग्य विभागाचे लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या