शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: केंद्राकडून लसी मिळताच लहानग्यांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 08:04 IST

लहानांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र आग्रही आहे. लसी मिळताच लहानग्यांच्या लसीकरणाची मोहीम तातडीने हाती घेतली जाईल, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

मुंबई : राज्याने १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात आघाडी घेतलेली आहे, तसेच १८ वर्षांखालील व्यक्तींच्या लसीकरणाचीही राज्याची तयारी आहे. मात्र, लहानग्यांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडून कोणतेही दिशानिर्देश आलेले नाहीत. आयसीएमआरनेदेखील याबाबतच्या मार्गदर्शक सूचना अद्याप जारी केलेल्या नाहीत. लहानांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र आग्रही आहे. लसी मिळताच लहानग्यांच्या लसीकरणाची मोहीम तातडीने हाती घेतली जाईल, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी गुरुवारी मंत्रालयात आरोग्य मंत्री राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची बैठक झाली. यानंतर टोपे म्हणाले की, १८ वर्षांवरील महाविद्यालयीन युवांच्या लसीकरणाची गती वाढविण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान राज्यात मिशन युवा स्वास्थ्य कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. तर, २५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेसाठी प्रत्येक महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची माहिती, संख्या मिळविण्याचे काम विभागाने तातडीने हाती घेतले आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत आरोग्य विभागाला आवश्यक माहिती पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसRajesh Topeराजेश टोपे