शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 23:17 IST

जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात ११ हजार ५०१ नमुने तपासले आहेत. ज्यात ८१४ कोरोना रुग्ण आढळले. त्यातील एकट्या मुंबईत ४६३ रुग्ण समोर आले होते

मुंबई - महाराष्ट्रात कोविड १९ च्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे नवीन ६५ रुग्ण आढळले आहेत. त्यातील मुंबईत २२, पुण्यात ९, ठाण्यात ६, पिंपरी-चिंचवडमध्ये २, कोल्हापूर आणि नागपूर येथे १ रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असले तरी दिलासादायक चित्र म्हणजे ३०० कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ५०६ इतकी आहे.

११५०१ नमुन्यांपैकी ८१४ कोरोना संक्रमित

जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात ११ हजार ५०१ नमुने तपासले आहेत. ज्यात ८१४ कोरोना रुग्ण आढळले. त्यातील एकट्या मुंबईत ४६३ रुग्ण समोर आले होते.  जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील ७ रुग्ण गंभीर आजाराने ग्रस्त होते. मृतांमध्ये पहिल्या रुग्णाला हायपोकेल्सेमिया आणि नेफ्रोटिक सिड्रोम आजार होता. दुसरा रुग्ण कॅन्सरग्रस्त होता. तिसऱ्या रुग्णाला स्ट्रोक होता. चौथ्या रुग्णाला डायबिटिक किटोएसिडोसिस आजाराने पीडित होता. 

देशात कोरोना रुग्ण किती?

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ दिसत आहे. सक्रीय रुग्ण संख्या ३ हजारांवर पोहचली आहे. रविवारी सकाळपर्यंत देशात ३७५३ सक्रीय रुग्ण होते. त्यातील बहुतांश केरळमधील आहेत. केरळमध्ये १३३६ सक्रीय रुग्ण आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये जगात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला होता. सर्वात आधी चीनच्या वुहान शहरात कोरोना रुग्ण सापडला. त्यानंतर अतिशय वेगाने हा व्हायरस जगभरात पसरला. मार्च २०२० मध्ये कोरोना महामारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केली.

दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण ३० जानेवारी २०२० मध्ये केरळमधील त्रिशुर येथे सापडला. इथल्या २० वर्षीय विद्यार्थिनीला जी चीनच्या वुहानमधून भारतात परतली होती ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर देशात कोरोना पसरत गेला. एप्रिल २०२० मध्ये देशात वेगवेगळे कोरोना रुग्ण आढळले. भारतात २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली. त्यावेळी देशात २४ मार्च २०२० मध्ये २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला होता. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या