शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दुबईला जाणाऱ्या ४० प्रवाशांचे कोरोना अहवाल बनावट; मुंबई विमानतळावर रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 06:51 IST

प्रवाशांनी सादर केलेल्या क्यू आर कोडमधील माहितीत तफावत का आढळली याची चौकशी करण्यात येणार आहे.

मुंबई : दुबईला जाणाऱ्या ४० प्रवाशांचे कोरोना अहवाल बनावट निघाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई विमानतळावर केलेल्या 'क्यू आर' कोड तपासणीत ही बाब उघड झाली. त्यामुळे संबंधित प्रवाशांना प्रवास करण्यापासून रोखण्यात आले.संयुक्त अरब अमिरातीला जाणाऱ्या प्रवाशांना दोन वेळा कोरोना चाचणी करावी लागते. पहिली ४८ तास आधी आणि दुसरी ६ तास आधी या चाचण्या कराव्या लागतात. सहा तासांत अहवाल मिळणे शक्य नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने ४ हजार ५०० रुपये मोजून जलद चाचणी करावी लागते. तिचा अहवाल केवळ १३ मिनिटांत मिळतो.प्रवाशांनी सादर केलेल्या अहवालावरील 'क्यू आर' कोड तपासल्याशिवाय तो मंजूर केला जात नाही. १२ नोव्हेंबरला मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांचा जलद चाचणी अहवाल 'क्यू आर'द्वारे तपासला असता त्यातील माहितीत तफावत दिसून आली. सुमारे ४० प्रवाशांचा अहवाल अशा प्रकारे बनावट आल्याने सर्वांनाच धक्का बसला. संबंधित प्रवाशांना विमान प्रवास करण्यापासून रोखण्यात आलेच, शिवाय जलद आरटीपीसीआर चाचणीसाठी केली जाणारी पूर्वनोंदणी प्रक्रियाही थांबविण्यात आली, अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी  दिली.

स्वतंत्र नोंदणी कक्ष आणि चाचणी- दुबईला जाणाऱ्या प्रवाशांकरिता मुंबई विमानतळ प्रशासनाने टर्मिनल २ वर (गेट क्रमांक ८) विशेष प्रवेशद्वार आरक्षित केले आहे. तेथील निर्गमन हॉलमध्ये स्वतंत्र नोंदणी कक्ष, चाचणी आणि प्रतीक्षागृहाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.- प्रवाशांनी सादर केलेल्या क्यू आर कोडमधील माहितीत तफावत का आढळली याची चौकशी करण्यात येणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईDubaiदुबई