शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, मात्र घाबरण्याची अजिबात गरज नाही!

By संतोष आंधळे | Updated: December 20, 2023 21:57 IST

गरजेच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

सतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे नवीन रुग्ण राज्यात सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा कोरोना आजाराच्या विषयाला घेऊन चर्चा सुरु झाली आहे. केरळमध्ये सापडलेल्या जे एन. १ या नवीन व्हेरियंटच्या पार्शवभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आवाहान राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. राज्यात काही ठिकाणी नवीन रुग्ण सापडत असले तर दक्षता घ्यावी मात्र घाबरण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व लोकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर कोविड योग्य वर्तन गरजेचे असल्याच्या सूचना केल्या आहेत.

राज्यात सध्याच्या घडीला एकूण कोरोनाचे एकूण ४५ सक्रिय रुग्ण असून ते विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तसेच बुधवारी राज्यात १४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई - ४, ठाणे मनपा -३ , रायगड -१, पुणे मनपा - ४, पिंपरी चिंचवड मनपा - २ रुग्णांचा समावेश आहे. तसेच ४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एक रुग्ण अतिदक्षता विभागात असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

इन्फ्लुएंझा सारखे आजार आणि श्वसन विकाराचा गंभीर संसर्ग असलेल्या रुग्णांच्या चाचण्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच सर्व जिल्ह्यांना कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याचे सांगण्यात आले आहे.

सिंधूदुर्गात पहिला जे एन. १ चा रुग्ण

देशात जे एन. १ या व्हेरियंटचा रुग्ण केरळमध्ये सापडला आहे. हा रुग्ण ७९ वर्षाची महिला असून हा रुग्ण पूर्णपणे बरा झालेला आहे. जे एन. १ हा ओमिक्रोन  व्हेरियंटचा उपप्रकार असून , यामुळे रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे या व्हेरियंटची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यकता दक्षता घेण्याची गरज आहे. राज्यांमध्ये नियमितपणे जनुकीय क्रमनिर्धारण ( जीनोम सिक्वेसिंग ) करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यामध्ये एक जे एन . १ या व्हेरियंटचा रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण सिंधुदुर्ग येथील ४१ वर्षाचा पुरुष आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य