शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

कोपर्डी प्रकरण : खटल्यात हवी मुख्यमंत्र्यांची साक्ष!

By admin | Updated: June 24, 2017 04:15 IST

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात साक्षीदार म्हणून थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करावा

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात साक्षीदार म्हणून थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करावा, अशी मागणी बचाव पक्षाने केली आहे़ बचाव पक्षाच्या वकिलांनी साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा समावेश केला असून तसा अर्ज न्यायालयाकडे केला आहे. येत्या ७ जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे़ जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू आहे़ या खटल्यातील आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमे याचे वकील अ‍ॅड़ प्रकाश आहेर यांनी शुक्रवारी न्यायालयात अर्ज सादर केला़ या खटल्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एका वृत्तपत्राच्या संपादकांचा साक्षीदारांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली. कोपर्डी घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत व वृत्तवाहिन्यांशी बोलताना आरोपींना फाशी होणार असल्याचे वक्तव्य केले होते़ त्याच अनुषंगाने त्यांचा साक्षीदाराच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली असल्याचे अ‍ॅड़ आहेर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले़ आता याबाबत न्यायालयात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ आरोपी नितीन भैलुमे याचा न्यायालयात ३१३ अंतर्गत जबाब नोंदवून घेण्यात आला़ साक्षीदारांनी घटनेविषयी दिलेली माहिती आरोपीला सांगून त्याचे म्हणणे ऐकून घेण्यात आले़ भैलुमे याने साक्षीदारांनी दिलेल्या माहितीबाबत कल्पना नसल्याचे सांगितले़