शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 :धरणे भरण्यापेक्षा स्वयंपाक बरा; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 06:50 IST

झुणका-भाकर योजना गेली कुठे? शरद पवारांचा उद्धव यांना सवाल

मुंबई :विधानसभा निवडणुकीचा प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप-शिवसेनेचे नेते व राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे. धरणं भरण्यापेक्षा स्वयंपाक बरा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवारांना लगावला, तर दहा रुपयांत थाळी योजनेवर पवारांनी टीका केली होती.

विधानसभा निवडणुकीतही सत्ताधारी पक्षाने शरद पवारांनाच टार्गेट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस पवारांवर सडकून टीका करीत आहेत. तुम्ही सत्तेच्या पंधरा वर्षांच्या काळात काय काम केले, असा सवाल शहा यांनी पवारांना विचारला, तर समोर पहिलवान नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आता या वाक्युद्धात उद्धव ठाकरे यांनीही उडी घेतली आहे.

शिवसेनेने वचननाम्यात दहा रुपयांत पोटभर जेवण देण्याचे आश्वासन दिले आहे. यावर तुम्ही सरकार चालविणार की स्वयंपाक करणार? तुमची झुणका-भाकर योजना कुठे गेली, असे सवाल पवार यांनी केला. ही टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली. जनतेसाठी आम्ही स्वयंपाक करू, पण आम्हाला तुमच्या पुतण्याने भरलेल्या ‘त्या’ धरणातले पाणी नको, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेनाप्रमुख असले असते, तर असा मित्र नको, असे म्हणाले असते. स्वत: काही चांगलं करायचं नाही आणि जे चांगलं करतात, त्याला करू द्यायचे नाही, अशी पवारांची नीती आहे. शरद पवार आधी उडी घेतात आणि पुन्हा ओरडत बसतात, अशी टीकाही त्यांनी केली.पंतप्रधान, गृहमंत्री यांना माझे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. ही गोष्ट चांगली आहे. शरद पवार, शरद पवार आणि शरद पवार, असा माझ्या नावाचा जप केला जातोय. मी सत्तेत नसतानाही ते दोघेही माझ्यावर टीका करतात. त्यांना झोपेतही मीच दिसतो.- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षआम्ही आमच्या वचननाम्यात १ रुपयात आरोग्य तपासणीची घोषणा केली आहे़ मात्र, हे (शरद पवार) त्यावरही ओरडत सुटले आहेत़ हा निव्वळ विघ्नसंतोषीपणा आहे़ गरज असेल तर या योजनेतून आम्ही तुमचीही डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करू.- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार