गणपती महोत्सवात विदेशी पर्यटकांची विशेष सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 06:25 PM2017-07-25T18:25:33+5:302017-07-25T18:28:24+5:30

यंदा 125 व्या वर्षानिमित्त मुंबईतील गणेशोत्सव विदेशी पर्यटकांना चांगल्या प्रकारे अनुभवता यावा यासाठी सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

Convenience for tourists during Ganpati Festival | गणपती महोत्सवात विदेशी पर्यटकांची विशेष सोय

गणपती महोत्सवात विदेशी पर्यटकांची विशेष सोय

Next

मुंबई, दि. 25 - यंदा 125 व्या वर्षानिमित्त मुंबईतील गणेशोत्सव विदेशी पर्यटकांना चांगल्या प्रकारे अनुभवता यावा यासाठी सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत माहिती दिली.  पर्यटकांना सुरक्षित पोहोचविणे, त्यांना आणणे, पासेसचे वितरण करणे, आदींबाबत त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांना सूचना केल्या. गणेशोत्सवाच्या काळात विदेशी पर्यटकांच्या राहण्यासंदर्भात, त्यांच्या वाहतूकीसंदर्भात एअरबीएनबी या कंपनीची मदत घेऊन पर्यटकांना अधिकाधिक सुविधा पुरवाव्यात, तसेच यासंदर्भात येत्या आठवडाभरात नियोजन करून त्या संदर्भात बैठक घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

125 व्या वर्षानिमित्त यंदाचा गणपती महोत्सव हा जगातील सर्वात मोठा मोहोत्सव असेल, त्या दृष्टीने नियोजन करा, तसेच पर्यटकांना अधिकाधिक सुविधा मिळतील अशी व्यवस्था करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबईतील गणपती उत्सवाचे दर्शन सोयीचे होण्यासंदर्भात नियोजन बैठकीचे मंत्रालयीन दालनात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रावल यांनी ही माहिती दिली. 

पर्यटकांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात एक वेळी 200 विदेशी पर्यटकांची व्यवस्था होणार आहे.  टेंट उभारणे,स्वच्छता करणे, आदी बाबी महानगरपालिका हाताळणार असून अन्य सुविधा पर्यटन विभागातर्फे करण्यात याव्या अशी मागणी बृहन्मुंबई महानगपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत केली. मुंबई हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. त्या पार्श्वभूमिवर बृहन्मुंबई महानगरपालिकेत एक स्वतंत्र कक्ष असावा, जेणेकरून पर्यटकांना अधिक सोयी देणे, समन्वय साधणे सोयीचे होईल, याबाबत कार्यवाही करा असे निर्देशही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

या बैठकीत मुंबईतील गणेशोत्सव, मुंबई मेलासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे  अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, व्यस्थापक मोषमी कोसे, सहाय्यक पोलीस आयुक्त रविकांत बुवा यांच्यासह बृहन्मुंबई महानगपालिकेचे  अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Convenience for tourists during Ganpati Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.