शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चातील मोर्चेकऱ्यांसाठी शिवसेनेकडून न्याहारीची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 10:24 IST

मुंबईतून निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी शिवसेनेने यंदा उघडपणे आपला सहभाग दाखविला आहे.

ठळक मुद्दे मुंबईतून निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी शिवसेनेने यंदा उघडपणे आपला सहभाग दाखविला आहे.मुंबईतील मराठा मोर्चासाठी राज्यभरातून येत असलेल्या मोर्चेकऱ्यांसाठी बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून पक्षातर्फे न्याहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.ठाण्यातील आनंदनगर जकात नाक्यावर तब्बल ७० हजार मोर्चेकऱ्यांना पुरतील इतके वडापाव आणि चहाची व्यवस्था करण्यात आली आहे

मुंबई, दि. 9- मुंबईतून निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी शिवसेनेने यंदा उघडपणे आपला सहभाग दाखविला आहे. मुंबईतील मराठा मोर्चासाठी राज्यभरातून येत असलेल्या मोर्चेकऱ्यांसाठी बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून पक्षातर्फे न्याहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यातील आनंदनगर जकात नाक्यावर तब्बल ७० हजार मोर्चेकऱ्यांना पुरतील इतके वडापाव आणि चहाची व्यवस्था करण्यात आली आहे, तर नवी मुंबईतील करावे येथील तांडेल मैदानावर ३५ हजार थाळी कांदेपोहे मागविण्यात आले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामात लक्ष घातलं असून ठाणे महापालिकेतील काही वरिष्ठ  अधिकाऱ्यांनाही आवश्यक मनुष्यबळ उभं केलं आहे. या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी खास सोय आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्यांचे खाण्यापिण्याचे हाल होऊ नये म्हणून ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचं बोललं जातं आहे.

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्यावतीने बुधवारी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी तब्बल २५ लाखांहून अधिक समाजबांधव सहभागी होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे. यापूर्वी राज्यभर निघालेल्या मराठा मोर्चा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता बुधवारी मुंबईत निघणाऱ्या या मोर्चाकडे संपूर्ण देशाच लक्ष लागलं आहे.

राज्यभरात आतापर्यंत निघालेल्या मराठा मोर्चात सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी सहभाग घेतला होता. पण विशेष म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या 57 मोर्चात कुठलंही राजकीय भाषण झालं नाही. बुधवारी सकाळपासूनच मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने येणार आहेत. हे लक्षात घेऊन मुंबई-ठाण्याच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर जकात नाका येथे शिवसेनेने मोर्चेकऱ्यांसाठी वडापाव आणि चहाची खास व्यवस्था केली असून गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना येथील व्यवस्थेच्या कामाला लावलं आहे. नवी मुंबईत करावे येथील तांडेल मैदानात मोर्चेकऱ्यांसाठी कांदापोहे, चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी शिवसेनेचे स्थानिक नेते विजय चौगुले यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.