शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

‘एमआयएम’ आमदाराच्या वक्तव्यावरून वादंग

By admin | Updated: December 2, 2015 02:03 IST

एमआयएमचे औरगांबाद येथील आमदार इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना राष्ट्रगीताबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून वादंग उठले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने

मुंबई : एमआयएमचे औरगांबाद येथील आमदार इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना राष्ट्रगीताबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून वादंग उठले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी दादर येथील शिवसेना भवनासमोर निषेध मोर्चा काढला. जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.आमदार जलील यांनी सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीवरील चर्चेत सहभाग घेताना राष्ट्रगीताला उद्देशून ‘नौटंकी’ शब्द उच्चारल्याचा आक्षेप घेत मनसेने हे आंदोलन केले. मात्र त्यासाठी नेमकी शिवसेना भवनासमोरील जागा निवडल्याने त्यामागील ‘राज’कारणाचीही चर्चा सुरु राहिली. आपले भाष्य मोडतोड करून वापरले जात असल्याचे स्पष्टीकरण इम्तियाज जलील यांनी दिले आहे. राष्ट्रगीतासाठी आपण नौटंकी असा शब्दप्रयोग केला नव्हता, तर मनसेला नौंटकी म्हटल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)काय आहे नेमके प्रकरण?कुर्ला पश्चिमेकडील फिनिक्स मॉलमधील पीव्हीआरमध्ये ‘तमाशा’ चित्रपटाच्या एका शो पूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना एक कुटुंब खुर्चीवर बसून राहिले होते. त्यामुळे अन्य प्रेक्षकांनी त्यांच्या कृतीचा निषेध करीत त्यांना चित्रपटगृहातून बाहेर काढले होते. याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर ‘व्हायरल’ झाल्यानंतर त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर सोमवारी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत मनसेचे अमेय खोपकर व आमदार जलील यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी मनसेने त्यांच्या कथित वक्तव्याबाबत आंदोलन केले. एमआयएम पक्षाचा प्रतिकात्मक झेंडा जाळण्यात आला. तसेच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्यावर या प्रकरणी राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.