शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांच्या मतदानावेळी मुलांमध्ये वाद

By admin | Updated: October 16, 2014 22:53 IST

अखेर दृष्टी अधू झालेल्या वृध्दाने मतदान केलेच नाही.. राजकीय अभिनिवेशामुळे नाती तुटू नयेत

बाबासाहेब परीट - बिळाशी --नात्यात राजकारण नसावं. राजकारणातही नाती जपावीत, पण कधी-कधी राजकारण नाती तोडतं. राजकीय अभिनिवेशामुळे आई-बापाला वेठीस धरून वाटणीचा हिशेब मांडण्याचा अनोखा प्रकार शिराळा तालुक्यातील एका धनिक गावातील मतदान केंद्रावर नुकताच घडला. अखेर दृष्टी अधू झालेल्या वृध्दाने मतदान केलेच नाही.शिराळा तालुक्यात नगदी पिकात अग्रेसर असणाऱ्या एका गावात सकाळी लवकर मतदान केंद्रावर आपल्या वृद्ध आई-वडिलांना घेऊन त्यांचा मुलगा आला. ही बातमी त्यांच्या दुसऱ्या मुलाला विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांनी मोबाईलवरुन सांगितली. त्यामुळे तोही तेथे आला. त्या वृध्द दाम्पत्याला चार मुले. ती चारही वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी निगडीत आहेत. बापाची इच्छा वेगळ्याच उमेदवाराला मत देण्याची. ज्यानं आई-बापाला मतदान केंद्रावर आणलं होतं, त्यानं चार दिवसांपूर्वी आई-बापाला सांभाळण्यासाठी आणलं होतं. ज्यानं आणलं, तो म्हणत होता, दोघांचे मतदान मीच करणार. पण यापूर्वी ज्या मुलाने आई-बापाला सांभाळलं होतं, तोही म्हणत होता, मी त्यांचं मतदान करणार. या गोंधळात आईचं मतदान एका लेकाने केलं आणि बापाच्या मतदानावेळी अटी-तटीचा सामना सुरू झाला. शेवटी वैतागून बापाने मतदान केंद्रावरील लोकांना फर्मावले, ‘आरं, माझंच मत मला द्यायला येईना, तर काय उपेग? मला घरला न्या. माझी वाटणी केलीसा. आता माझ्या मताची वाटणी तुम्हाला करता येणार नाय.’ असं म्हणून ते रिक्षात जाऊन बसले. शेवटी राजकारणापेक्षा नाती महत्त्वाची असतात. राजकारण आणि नात्यात गफलत होता कामा नये आणि राजकीय अभिनिवेशामुळे नाती तुटू नयेत, हे तिथं कुणी सांगावं? कारण ते ठिकाण सांगण्याचं नव्हतं आणि ऐकण्याच्या स्थितीत तर कोणीच नव्हतं. राजकीय अभिनिवेशामुळे नाती तुटू नयेतशेवटी राजकारणापेक्षा नाती महत्त्वाची असतात. राजकारण आणि नात्यात गफलत होता कामा नये आणि राजकीय अभिनिवेशामुळे नाती तुटू नयेत, हे तिथं कुणी सांगावं? कारण ते ठिकाण सांगण्याचं नव्हतं आणि ऐकण्याच्या स्थितीत तर कोणीच नव्हतं. राज्यकर्त्यांनीच भान ठेवून नाती टिकविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.