शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंग दुकानातील काळाबाजारावर डिजिटायझेशनच्या माध्यमातून नियंत्रण

By admin | Updated: June 14, 2017 18:17 IST

राज्यातील प्रत्येक रेशनकार्ड आधारशी संलग्न करण्याची मोहीम सध्या सुरू आहे. याद्वारे अधिकृत रेशनिंग दुकानदारांना

राजू काळे/ ऑनलाईन लोकमतभार्इंदर, दि. 14 - राज्यातील प्रत्येक रेशनकार्ड आधारशी संलग्न करण्याची मोहीम सध्या सुरू आहे. याद्वारे अधिकृत रेशनिंग दुकानदारांना विविध योजनांतर्गत पुरविण्यात आलेल्या धान्यावर थेट डिजिटायझेशनच्या माध्यमातून पॉज मशिनमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रेशनिंगचा काळाबाजार लवकरच संपुष्टात येणार असल्याची माहिती राज्य ग्राहक आयोग तसेच अन्न सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी लोकमतला दिली.मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील ग्राहकांसंबंधी उपलब्ध योजना व सोईसुविधांचा आढावा घेण्यासाठी देशपांडे बुधवारी पालिका मुख्यालयात प्रथमच आले होते. त्यांनी पालिकेसह पुरवठा कार्यालयासह, अन्न प्रशासन, वजने व मापे महामंडळातील अधिकाऱ्यांद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध योजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत नागरीकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा अहवाल त्यांना सादर करण्यात आला. यावर माहिती देताना त्यांनी राज्यातील प्रत्येक रेशनकार्ड धारकांना धान्य मिळविण्यात येणारी अडचण व त्यात होणारा भ्रष्टाचार लवकरच संपुष्टात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक रेशनकार्ड आधारशी संलग्न करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक योजनेंतर्गत अधिकृत रेशनिंग दुकानदारांना मिळणाऱ्या धान्य पुरवठ्यावर वरिष्ठ स्तरावरून पॉज मशिनद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यामुळे त्यात घोटाळा होणे अशक्य ठरणार आहे. राज्य सरकारकडून दुकानदारांना पॉज मशिन पुरविण्यात येणार आहे. यामुळे दुकानदारांना धान्य पुरवठ्याची कागदोपत्री नोंद ठेवणे आवश्यक ठरणार नाही. मशिनद्वारे रेशनकार्डधारकांचे थम्ब इम्प्रेशन संग्रहित केले जाणार आहेत. नोंदणीकृत ग्राहकाने रेशनचे धान्य खरेदी केल्यास त्याची नोंद त्या मशिनद्वारे थेट रेशनिंग कार्यालयासह राज्याच्या पुरवठा विभागाकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक योजनेंतर्गत दुकानदाराने विकलेल्या धान्य पुरवठ्याचे प्रमाण वेळीच तपासले जाणार आहे. तरीदेखील दुकानदाराने काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची माहिती मशिनद्वारे मिळुन दुकानदारावर त्वरीत कारवाई केली जाणार आहे. तसेच एखाद्या वस्तूचा दर, दुकानदाराकडून अधिकतम मूल्यापेक्षा (एमआरपी) जास्त वसूल केल्यास तो गुन्हा ठरतो. अनेकदा शीतपेटीतील (फ्रिज) मिनरल वॉटरच्या बाटल्या ग्राहकांना एमआरपीपेक्षा जास्त दराने विकल्या जातात. हे बेकायदेशीर असुन त्याप्रकरणी विक्रीदारावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार ग्राहकांना देण्यात आला आहे. ग्राहकांनी त्याची तक्रार (०२२) २२८८६६६६ या क्रमांकावर करावी, असे आवाहन त्यांनी केले. कारवाईचा अधिकार वजने व मापे महामंडळाकडे असल्याची माहिती देण्यात आली.