शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

२५ हजार कोटींची १२ कंपन्यांना कंत्राटे

By यदू जोशी | Updated: June 1, 2018 06:20 IST

महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे ६२३ किलोमीटरचे २५ हजार ९० कोटी रुपयांचे कंत्राट नामवंत १२ कंपन्यांना गुरुवारी देण्यात आले

यदु जोशीमुंबई : महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे ६२३ किलोमीटरचे २५ हजार ९० कोटी रुपयांचे कंत्राट नामवंत १२ कंपन्यांना गुरुवारी देण्यात आले. त्यात रिलायन्स, एल अ‍ॅण्ड टी, जीव्हीपीआर आदी कंपन्यांचा समावेश आहे.या महामार्गाचे कंत्राट एक-दोन कंपन्यांना देण्याऐवजी विविध १६ टप्पे करून ते विविध कंपन्यांना देण्याचे धोरण राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आखले आहे. महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी एमएसआरडीसीने ही भूमिका घेतली आहे. त्यातील १३ टप्प्यांची कामे १२ कंपन्यांना गुरुवारी देण्यात आली. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ सहा तासांत कापता येणार आहे.कोणत्या कंपनीला किती कोटी रुपयांचे आणि कोणत्या टप्प्याचे काम देण्यात आले आहे त्याची माहिती अशी : १) मेघा कंपनी १५९४ कोटी रु. - ० किलोमीटर ते ३१ किमी शिवमडका ते खडकी आमगाव (जि. नागपूर), २) अ‍ॅफकॉन्स २८७४.८० कोटी - ३१ किमी ते ८९.४१ किमी खडकी आमगाव ते पिंपळगाव (जि.वर्धा), ३) नॅशनल कन्स्ट्रक्शन कंपनी ३००८.९९ कोटी - ८९.३० ते १६२.६६ किमी आष्टा ते वढोणा रामनाथ (जि. अमरावती), ४) पीएनसी लिमिटेड २०९९.५२ कोटी - १६२.६६ ते २१७.०२ किमी डोनद ते जनुना (जि. वाशिम), ५) सद्भाव कंपनी १६६५ कोटी - २१७.२३ ते २५९.९० किमी किन्ही राजा ते केणवद (जि.वाशिम), ६) अ‍ॅपको लिमिटेड - १२४६.५० कोटी - २५९.९० ते २९६ किमी बेलगाव ते पारडा (जि.बुलडाणा), ७) रिलायन्स - १९२६.९९ कोटी - २९६ ते ३४७.१९ किमी बांदा ते सावरगाव माल (जि.बुलडाणा), ८) मोन्टे कार्लो -१३८१.५० कोटी - ३४७.७२ ते ३९०.४४ किमी नाव्हा ते गेवराई (जि. जालना), ९) मेघा १९२२ कोटी - ३९०.४४ ते ४४४.४८ किमी बेंडेवाडी ते फतिवाबाद (जि. औरंगाबाद), १०) एल अ‍ॅण्ड टी २१४९ कोटी - ४४४.८४ ते ५०२.७५ किमी. फतिवाबाद ते सुराळा (जि. औरंगाबाद), ११) गायत्री प्रोजेक्टस् १३९३.९० कोटी - ५०२.६९ ते ५३२.०९ किमी. धोत्रे ते डेर्डे कºहाळे (जि.अहमदनगर), १२) दिलीप बिल्डकॉन १७५०.०५ कोटी - ५३२.०९ ते ५७७.७३ किमी पाठारे खुर्द ते सोनारी (जि. नाशिक), १३) बीएसी अ‍ॅण्ड जीव्हीपीआर संयुक्त कंपनी २०७९ कोटी - ५७७.७३ ते ६२३.३७ सोनारी ते तारांगणपाडा (जि. नाशिक).सर्वांत कमी दराची निविदा असलेल्या कंपन्यांनाच काम देण्यात आले आहे. तथापि, प्रत्येक कंपनीला मूळ निविदा किमतीच्या ७.९२ ते २७.५५ टक्के जादा दराने कामे देण्यात आली आहेत. महामार्गाच्या गुणवत्तेत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने हा जादा दर द्यावा लागला असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.तीन टप्प्यांचे कंत्राट बाकी : या महामार्गाच्या उभारणीसाठी आणखी तीन टप्प्यांचे कंत्राट अद्याप देणे बाकी आहे. या टप्प्याचे अंतर केवळ ७८ किलोमीटरचे आहे.