शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवरातील अतिसंवेदनशील क्षेत्रात पुन्हा खोदकाम सुरू

By admin | Updated: July 24, 2016 21:52 IST

वनविभागाच्या आशीर्वादाने अतिसंवेदनशील क्षेत्रात वारंवार सरोवर काठावरील गौणखनिजाचे उत्खनन करून रस्ते बनविले जात आहे.

मयूर गोलेच्छा/ऑनलाइन लोकमत लोणार, दि. 24 -  पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने लोणार सरोवरालगतच्या वन्यजीव अभयारण्यापासून १०० मीटरचा परिसर चारही बाजूने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतरही वनविभागाच्या आशीर्वादाने अतिसंवेदनशील क्षेत्रात वारंवार सरोवर काठावरील गौणखनिजाचे उत्खनन करून रस्ते बनविले जात आहे. यामुळे सरोवराच्या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या प्रयत्नांना वन विभागाकडून सातत्याने खीळ घालण्याचा प्रकार होत आहे.पर्यावरणाचे संरक्षण होण्याच्या हेतूने सरोवरालगतच्या अतिसंवेदनशील क्षेत्रातील १०० मीटर परिसरात गौण खनिज उत्खननासह पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या बाबींवर पायबंद घालण्यात आला आहे परंतु ज्या वन विभागावरसरोवर आणि पर्यावरण संरक्षणाची मुख्य जबाबदारी आहे त्याच वन विभागाकडून सातत्याने शासनाच्या नियमाची पायमल्ली केली जात आहे. यापुर्वीही एकदा अशाच प्रकारे वन विभागाने सरोवर काठावरील गौण खनिजाचे नियमबाह्यपणेउत्खनन करून रस्ता तयार केला होता. त्यावेळीही कोणतीच कारवाई संबंधित विभागाकडून यास कारणीभूत वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्यावर करण्यात आली नाही. त्यामुळेच की काय पुन्हा एकदा कायदा तोडून आणि पर्यावरणाचेनियम धाब्यावर बसवून वन विभागाने सरोवर काठाला क्षतीग्रस्त करण्याची हिंम्मत दाखवली आहे. पर्यावरण विभागाने सरोवरालगतचा चारही बाजूचा १०० मीटर परिसर अतिसंवेदनशील क्षेत्र घोषित केल्यामुळे या क्षेत्रात नवीन बांधकाम, रासायनिक शेती, वृक्षतोड, प्लास्टीक पिशव्यांचा वापर, जल, वायू, आणि ध्वनीप्रदूषण करणाऱ्या सर्वच बाबींवर निर्बंध घातले असतांनाही सर्वसामान्यांकडून नियमांची पायमल्ली झाल्यानंतर कारवाई आणि तत्पर राहणाऱ्या वनविभागाने नियम धाब्यावरबसवून केलेल्या कृत्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होणार काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.अतिसंवेदनशील क्षेत्रातील १०० मीटर परिसरातच वन विभागाने दोन भव्य प्रवेशव्दाराचे बांधकाम सुरू केले आहे. १०० मीटर परिसरात वनविभागाच्या आशिर्वादाने गावठी दारूच्या हातभट्टया उभारल्या जात आहे तसेच प्लास्टीकचा वापरही होतांना दिसून येतो. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेला निर्णय कुचकामी ठरू पाहत आहे.