शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडकरांना दूषित पाणी

By admin | Updated: July 23, 2016 03:10 IST

पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे विक्रमगडकरांना नगरपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा दूषित पद्धतीने सुरु झाला

राहूल वाडेकर,

विक्रमगड- पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे विक्रमगडकरांना नगरपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा दूषित पद्धतीने सुरु झाला असून, या मातीमिश्रित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नव्याने राबविण्यात आलेली फिल्टर योजनाही पावसाळ्यात कुचकामी ठरल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.डॉक्टर नेहमीच सांगत असतात की,पाणी उकळून व गाळून प्यावे. परंतु नळाद्वारे येणारे पाणीच मातीमिश्रित असल्याने त्यावर कितीही प्रक्रिया केली तरी ते आरोग्याचे दृष्टीने धोकादायक आहे. अशुद्ध पाण्याचा प्रश्न दरपावसाळ्यातील असल्याने प्रशासन कोणतीही उपाययोजना आखतांना दिसत नाही. नगरपंचायतीकडून पाणीपट्टी वसुली नियमित असल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवतोच कसा, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.नगरपंचायतीकडून पूर्वी ग्रामपंचायत काळात लाखो रुपयांची सुधारित फिल्टर योजना राबविण्यात आलेली आहे. परंतु या फिल्टर योजनेत फक्त उन्हाळ्यातच स्वच्छ पाणी पहावयास मिळते. कारण तेव्हा ते स्वच्छच असते मात्र पावसाळा सुरु होताच नळाद्वारे येणारे पाणी गढूळ व मातीमिश्रीत असल्याने तोंडातही घ्यावेसे वाटत नाही.त्यातच इतर तालुक्यांच्या ग्रामपंचायती अगर जव्हार नगरपरिषद यांच्या तुलनेत विक्रमगड ग्रामपंचायतीची व सध्याची नगरपंचायतीची मासिक पाणीपट्टी जास्त म्हणजे १७५ रुपये आहे. सध्यस्थितीत विक्रमगड ही नगरपंचायत झाली असल्याने तिचा कारभार आणि जबाबदारी वाढली आहे. तसेच पाणीपुरवठ्यात लोकसंख्या वाढल्याने अजून भर पडली आहे. त्यामुळे आता नवीन सुधारित फिल्टर पाणीपुरवठा योजनेची मंजुरी मिळावी तसेच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी होत आहे.नगरपंचायत काय म्हणते...सध्यस्थितीत पाणीपुरवठ्यामध्ये साडेचार लाख लीटर पाण्याची आवश्कता आहे. तर फिल्टर प्लॅनमध्ये फक्त दीड लाख लीटर पाणी मर्यादा असल्याने दिवसातून चार वेळेस सोडण्यात येणारे पाणी पावसाळ्यात गढूळ व मातीमिश्रीत स्थितीत नळाला येते. त्यामुळे साडेचार लाख लीटर पाणी फिल्टर करण्याची क्षमता असलेला फिल्टर प्लॅन हवा तरच गढूळ पाणीपुरवठ्यामध्ये उपाययोजना करता येणार आहे. नवीन फिल्टर व पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठवलेला आहे. आम्ही सध्यस्थितीत आलामचा (तुरटी) वापर पाणी शुद्ध करणासाठी करीत आहोत. असे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले.विक्रमगड नगरपंचायतीमधील असलेल्या गावपाडयांना होणारा पाणीसाठा हा साडेचार लाख लीटरचा आहे. मात्र, पाणी फिल्टर प्लॅनची क्षमता दीड लाख लीटर असल्याने एवढे पाणी फिल्टर होऊ शकत नाही. त्यामुळेच दरवर्षी अशुद्ध पाणीपुरवठयाचा प्रश्न उद्भवत आहे. तरीही आम्ही पाण्यामध्ये आलाम टाकून शुध्दीकरणाचा प्रयत्न करतो!- सुरेश सोनवणे, तहसीलदार तथा प्रशासक नगरपंचायत>सध्या नळाला येणारे पाणी गढूळ व मातीमिश्रीत असल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. फिल्टर योजना असून नसल्यासारखी आहे. अव्वाचे सव्वा १७५ रुपये इतर तालुक्यांच्या मानाने जास्त अशी पाणीपट्टी असतानाही गढूळ पाणी का सेवन करायचे, असा सवाल आहे.-रवींद्र आयरे, ग्रामस्थ, विक्रमगड