शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Electricity: वाढत्या वीज दरावर ग्राहक आक्रमक, राज्यभरातून विरोधाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 08:34 IST

Electricity: राज्यभरातील विविध ग्राहक संघटनांसोबत वीज ग्राहकांनीही या वीज दरवाढीला विरोध दर्शविला आहे, तर दुसरीकडे विजेच्या दरांत वाढ का करावी लागत आहे, याची अनेक कारणे महावितरणने स्पष्ट केली आहेत.

मुंबई : महावितरणने येत्या दोन वर्षांसाठी विजेच्या दरात वाढ करून मिळावी, म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीची याचिका दाखल केली असतानाच, आता राज्यभरातील विविध ग्राहक संघटनांसोबत वीज ग्राहकांनीही या वीज दरवाढीला विरोध दर्शविला आहे, तर दुसरीकडे विजेच्या दरांत वाढ का करावी लागत आहे, याची अनेक कारणे महावितरणने स्पष्ट केली आहेत.वीज दरवाढीवर आपले म्हणणे मांडण्यासाठी महावितरणने दरवाढ याचिकेवरील चर्चासत्र आयोजित केले आहे. २ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता घिया हॉल, टेक्स्टाईल असोसिएशन, महाराष्ट्र चेंबर शेजारी, काळा घोडा, मुंबई येथे हे चर्चासत्र होणार आहे. राज्यातील सर्व जाणकार वीज ग्राहक, ग्राहक प्रतिनिधी, वीज क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध रहिवासी, औद्योगिक, व्यापारी, शेतकरी व ग्राहक संघटनांचे पदाधिकारी या चर्चासत्रात सामील होणार आहेत.

विजेचे बिल का वाढणार?वीज नियामक आयोगाने २०२० -२१ वर्षापासून महावितरणसाठी बहुवार्षिक दररचना मंजूर करताना महावितरणसाठी जो महसूल अंदाजित केला होता, तो कोरोना महासाथ आणि कोळशाच्या संकटामुळे वाढलेला खर्च यासह विविध कारणांमुळे गोळा झाला नाही. परिणामी, गेल्या चार आर्थिक वर्षांतील महसुली तूट आणि आगामी दोन आर्थिक वर्षातील अपेक्षित तूट या सहा वर्षांच्या तुटीचा विचार करता, महावितरणने आगामी दोन वर्षांत भरपाई करण्यासाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे.

ग्राहकांमध्ये काय भावना?दरवाढीच्या विरोधात ग्राहकांना तोंड द्यायलाच नको, म्हणूनच हेतुपुरस्सर ई-फायलिंग व ई-हियरिंग जाहीर केले आहे, अशी भावना ग्राहकांमध्ये दिसून येत आहे. प्रचंड बोजा पडल्यास राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहकांना दैनंदिन इतकी महागडी वीज वापरणेही परवडणार नाही.- प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना.दरवाढीमध्ये काय आहे?महावितरणने सहा वर्षांतील महसुली तूट भरून काढण्यासाठी २०२३-२४ व २०२४-२५ या दोन आर्थिक वर्षात दरवर्षी अनुक्रमे १४ टक्के आणि ११ टक्के सरासरी दरवाढ प्रस्तावित केली असून, ही सरासरी प्रस्तावित दरवाढ एक रुपयाच्या जवळपास आहे. प्रस्तावित सरासरी दरवाढीमध्ये स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार यांचा समावेश केलेला आहे.- विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महावितरण.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण