शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कोल्हापूरच्या गणेशोत्सवाचा विधायक पॅटर्न

By admin | Updated: September 11, 2016 04:04 IST

गणेशोत्सवाला विधायक वळण देण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून चाललेल्या प्रयत्नांना आता हळूहळू यश येत असल्याचे चित्र करवीरनगरीत दिसत आहे

समीर देशपांडे,  कोल्हापूरगणेशोत्सवाला विधायक वळण देण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून चाललेल्या प्रयत्नांना आता हळूहळू यश येत असल्याचे चित्र करवीरनगरीत दिसत आहे. यंदा तर डॉल्बीमुक्तीसाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, तरुण मंडळांच्या कार्यक र्त्यांची मने वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गणेश मंडळांना राजकीय मंडळींचा वरदहस्त असतो. अशातच पंधरा वर्षांपूर्वी गुटखा कंपन्यांनी अनेक मंडळांना प्रायोजकत्व दिले. मोठमोठ्या रकमा देऊन स्वागताच्या मोठ्या कमानी मंडपात दिसू लागल्या. याविरोधात सुरुवातीला कोल्हापुरातून आवाज उठविला गेला. जनस्वास्थ्य दक्षता समितीचे सुरेश शिप्पूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाच्या सर्व बाजूंवर काही वर्षे सातत्याने दबाव आणत, या गुटख्याच्या कमानी लावणे बंद करण्यात यश मिळविले. त्यानंतर, जलसाठ्यांच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी म्हणून चळवळ सुरू झाली. त्यातूनच निर्माल्य दानालाही चांगला प्रतिसाद मिळू लागलाय. मूर्तिदानालाही भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी अनेक जण उत्स्फूर्तपणे अंगणात बादलीत, काहिलीत मूर्ती विसर्जित करत आहेत. गेल्या आठ-दहा वर्षांत डॉल्बीने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. डॉल्बीच्या भिंती उभारून मंडळाची ताकद दाखवण्याची प्रथा कोल्हापुरात सुरू झाली. त्याला पेठांच्या अस्मितांची झालर दिसू लागली. मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर परिसरात डॉल्बी लावून देण्याची स्पर्धा सुरू झाली. मग यातूनच एका मंडळाच्या कार्यकर्त्याचा काही वर्षांपूर्वी खून झाला, तर डॉल्बीमुळे भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. डॉल्बीच्या तालावर बेभान नाचणारे कार्यकर्ते मग तुझा गणपती पुढे की माझा, यावरून तलवारी उपसायला लागले. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्या काळात डॉल्बीला थोडा चाप लागला. मात्र, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून विश्वास नांगरे-पाटील यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर, त्यांनी डॉल्बीमुक्तीला प्राधान्य दिले. त्यानुसार, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या टीमने कोल्हापूर जिल्ह्यात अथक प्रयत्न करून मंडळांना परावृत्त केले. अनेक मंडळांनी डॉल्बी लावणार नसल्याचे लिहून दिले आहे.