शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

११ कोटींचे काम एजंटला देण्यासाठी बांधकाम मुख्य अभियंत्याची धडपड

By admin | Updated: August 21, 2014 01:06 IST

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे ११ कोटींचे काम आपल्या मर्जीतील कंत्राटदार तथा एजंटला मिळवून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्याची धडपड सुरू आहे.

अकोला जिल्ह्यातील रस्ता : वीज निर्मिती कंपनीचा निधी, निकषांना बगलयवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे ११ कोटींचे काम आपल्या मर्जीतील कंत्राटदार तथा एजंटला मिळवून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्याची धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे त्यासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या या कामातील काही अटी शिथील करण्यात आल्या आहेत. पारस येथे वीज निर्मिती कंपनीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या अ‍ॅश बँडमुळे अकोला जिल्ह्यातील बाळापूर ते शेगाव या सुमारे पाच किलोमीटरच्या वळण रस्त्याचे काम केले जाणार आहे. या मार्गावर दोन पूलही उभारायचे आहेत. या कामासाठी वीज निर्मिती कंपनीने सार्वजनिक बांधकाम खात्याला ११ कोटी रुपये देण्याचे कबूल केले आहे. यातील ५० टक्के रक्कम बांधकाम खात्याकडे डिपॉझिटही करण्यात आली. ११ कोटींच्या या वळण रस्त्याच्या कामाची निविदा काढली गेली. हे काम आपल्या बापू नामक कंत्राटदार तथा एजंटला मिळावे म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. काम मोठे असल्याने त्यासाठी निकष व अटीही तेवढ्याच कठोर आहेत. त्यामुळे या एजंटची अडचण होवू लागली आहे. अनेक निकषात हा एजंट बसत नाही. म्हणून हे निकषच बाद ठरविण्याची तयारी सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत बापूला काम मिळवून द्यायचेच, असा निर्धार मंडपे यांनी केल्याचे दिसून येते.अमरावती विभागातील शासकीय कंत्राटदारांना बांधकाम साहित्याचे दर वाढवून हवे आहेत. मात्र त्यातही २० टक्के दरवाढीसाठी ‘डिलींग’चा प्रस्ताव असल्याची चर्चा बांधकाम यंत्रणेत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)ंकोण आहे हा बापू ?मुख्य अभियंता पी. एस. मंडपे यांचा एजंट असलेला हा बापू अकोला जिल्ह्यातील आहे. यापूर्वी तो अकोल्याच्या तत्कालीन अधीक्षक अभियंत्याचा एजंट म्हणून वावरत होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून वावरणारा बापू दिवसभर नियमित मुख्य अभियंत्यांच्या कक्षाबाहेर वावरताना दिसतो. त्याच्या इशाऱ्यावरच तेथील कामकाज सुरू असल्याचे बोलले जाते. मंडपेंना मीच अमरावतीत आणले, हे जाहीररीत्या सांगण्याची हिंमत बापू करतो, यावरून त्यांचे किती सख्य आहे ते स्पष्ट होते. मुळात बापूच्या नावाने एक कन्स्ट्रक्शन कंपनी रजिस्टर्ड आहे. त्यावर त्याने अनेक कामेही घेतली. याच कंपनीच्या नावे आता ११ कोटींचा कंत्राट मिळविण्याचा प्रयत्न आहे. मुळात बापू हा अकोल्यातील एका बड्या कंत्राटदाराकडे मुकादम म्हणून काम करीत होता. आजही या कंपनीच्या रेकॉर्डवर टेक्निकल वर्कसाठी बापूचेच नाव नोंदलेले आहे. प्रतिसाद न देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मंत्रालयापर्यंत तक्रारी करण्यात बापूचा हातखंडा आहे. दोन आठवड्यांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील एका काँग्रेस आमदाराला मंडपेंच्या अनुपस्थितीमुळे परत जावे लागले होते. त्यावेळी संतापलेल्या या आमदाराला ‘शांत’ करण्यासाठी बापूनेच पुढाकार घेतला. बापूने मंडपेंना आमदारांच्या दरबारात पेश केले. याच आमदाराच्या कार्यक्षेत्रातील केंद्रीय रस्ते विकास निधीची निविदा मंडपे यांनी एक महिना प्रलंबित ठेवली होती. मात्र आमदार भडकताच ती जुन्या तारखेत मंजूर करून दिली, हे विशेष.