शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १४ हजार घरगुती शौचालयांची उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 02:43 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शेल्टर असोसिएट्सचे ‘एक घर-एक शौचालय’ मॉडेल; देशात या मॉडेलचा विस्तार केला जाणार

पुणे : संपूर्ण देशभरातूनच उघड्यावर शौच करण्याची समस्या हद्दपार करण्याचा विडा पुण्यातील शेल्टर असोसिएट्स या स्वयंसेवी संस्थेने उचलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ‘एक घर-एक शौचालय’ या मॉडेलच्या माध्यमातून संस्थेतर्फे राज्यात १४ हजार घरगुती शौचालयांची उभारणी करण्यात आली असून, त्याचा लाभ जवळपास ३ लाख ६० हजार नागरिकांना मिळाला आहे.या मॉडेलमुळे राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, नवी मुंबई आणि ठाणे अशा ६ शहरांमधील नागरिकांची सार्वजनिक शौचालयांपासून सुटका झाली आहे. देशभरातील अनेक गावांमध्ये आजही घरांमध्ये शौचालयाअभावी उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. त्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कोणतीच पावले उचलली गेली नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ला सुरुवात करून स्वच्छतेच्या विषयासंबंधी जागरूकता निर्माण केली आहे. या मिशनअंतर्गत शेल्टर असोसिएट्स या संस्थेने या समस्येचे देशातून कायमचे उच्चाटन करण्यासंबंधी पुढाकार घेतला आहे.संस्थेने राज्यात १४ हजार घरगुती शौचालये उभी करून कुटुंबांच्या जीवनाला दिशा दिली आहे. मात्र, ही संस्था तेवढ्यावरच थांबली नाही,तर संस्थेने स्वत:च्या कार्याचे मूल्यांकनही गोखले इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेकडून करून घेतले.हा मूल्यमापनपर पूर्व-पश्चात-नियंत्रण अभ्यास एका वर्षाहून अधिक कालावधीत करण्यात आला. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली-मिरज व कोल्हापूर या ४ शहरांतील १६ झोपडपट्ट्यांतील जवळपास ४०० कुटुंबांचा समावेश करण्यात आला. मुख्यत्वे झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.घरगुती शौचालयांचा शंभर टक्के वापरया अभ्यास अहवालानुसार ८६.१ टक्के किशोरवयीन मुली सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत असून, १३.९ टक्के मुलींना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचे समोर आले आहे. मात्र, घरगुती शौचालयांची उभारणी केल्यानंतर १०० टक्के किशोरवयीन मुलींनी वैयक्तिक घरगुती शौचालयांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.पाच वर्षांखालील ९३.५ टक्के मुलांनी वैयक्तिक शौचालयांचा वापर करण्यास प्रारंभ केला असून, घरातच शौचालय उपलब्ध झाल्याने ६८ टक्के वेळेची बचत झाल्याचे पाहायला मिळाले. यातून उघड्यावर शौचाला बसण्याचे प्रमाण २९.६ टक्क्यांनी घटले असल्याची माहिती शेल्टर संस्थेकडून देण्यात आली.‘स्वच्छता किती महत्त्वाची आहे, हे आपण सर्वजण जाणतो. शेल्टर असोसिएट्स शहरातील वंचित लोकांसाठी कार्यरत आहे. त्यांच्या घरगुती शौचालय उभारणीचा प्रभाव जाणून घेण्याकरिता त्या ठिकाणांचे सर्व तपशील आम्हाला जाणून घ्यायचे होते. त्याचा अभ्यास केल्यानंतर अत्यंत चांगले निष्कर्ष समोर आले. शेल्टर असोसिएट्स आणि आॅन-ग्राऊंड कामगारांच्या संपूर्ण टीमच्या कार्याचे हे जणू एक प्रमाणपत्रच आहे.- अंजली राडकर, सहायक प्राध्यापक, गोखले इन्स्टिट्यूटशहरातील वंचित लोकांच्या, ज्यांना मूलभूत स्वच्छतादेखील मिळत नाही, अशांच्या जीवनामध्ये सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने या कामाला सुरुवात केली. याचे श्रेय आर्थिकदृष्ट्या कमकुवत स्तरातील लोकांना जाते. ज्यांनी सार्वजनिक शौचालय ते वैयक्तिक शौचालय हा फरक खुल्या मनाने स्वीकारला आणि मुली व स्त्रियांकरिता स्वच्छता व सुरक्षेचे महत्त्व जाणले. स्वच्छता क्रांतीचे आणखी पाऊल टाकून देशभरातील विविध शहरांमध्ये या मॉडेलचा विस्तार केला जाणार आहे.- प्रतिमा जोशीसहसंस्थापिका व कार्यकारी संचालिका, शेल्टर संस्था

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान