शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

बंधने उठली की कायम?

By admin | Updated: November 5, 2014 04:37 IST

या निकालाविरुद्ध अमित जमनादास सरैया व विशाल भागुजी शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या होत्या.

मुंबई: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मुंबईसह राज्याच्या इतरही भागांत मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवासंबंधीची अपिले निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिलेल्या निकालाने दहीहंडीच्या थरांची उंची आणि त्यातील अल्पवयीन मुलांचा सहभाग याविषयीचे निर्बंध कायम झाले आहेत की उठले आहेत, याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.काही समाजसेवकांनी केलेल्या जनहित याचिकांवर १४ आॅगस्ट २०१४ रोजी निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीमध्ये १८ वर्षांखालील मुलांनी सहभागी होण्यास तसेच हंडी फोडण्यासाठी २० फुटांहून अधिक उंचीचा मानवी मनोरा रचण्यास मनाई करण्याखेरीज  इतर बंधने घातली होती. या निकालाविरुद्ध अमित जमनादास सरैया व विशाल भागुजी शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर यंदाच्या जन्माष्टमीच्या चार दिवस आधी म्हणजे १४ आॅगस्ट रोजी अंतरिम आदेश देताना उच्च न्यायालयाच्या निकालातील परिच्छेद ४, ५, ७ आणि ८ या परिच्छेदांमधील निर्देशांची अंमलबजावणी प्रलंबित केली होती. त्यानुसार १८ वर्षांखालील मुलांचा दहीदंडीतील सहभाग, हंडीच्या थरांची कमाल उंची २० फूट आणि मुंबई पोलीस कायद्यात दुरुस्ती करून दहीहंडीचा ‘धोकादायक खेळ’ म्हणून समावेश करणे इत्यादी बाबींचा अंमल स्थगित झाला होता. २७ आॅक्टोबर रोजी सरैया व शिंदे यांच्या या विशेष अनुमती याचिकांवर न्या. अनिल आर. दवे, न्या. कुरियन जोसेफ व न्या. आर. के. अगरवाल यांच्या खंडपीठापुढे अंतिम सुनावणी झाली. त्या वेळी दिलेल्या निकालात खंडपीठाने आधी १४ आॅगस्ट रोजी दिलेला अंतरिम आदेश शब्दश: उद््धृत केला व त्या अंतरिम आदेशामुळे विशेष अनुमती याचिका निरर्थक ठरत असल्याने त्या आम्ही निकाली काढत आहोत, असे नमूद केले. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने समाधान झाले नाही म्हणून सरैया व शिंदे सर्वोच्च न्यायालयात गेले होते व त्यांचे म्हणणे सकृतदर्शनी पटले म्हणून त्या न्यायालयाने १४ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयाच्या निकालास अंशत: स्थगिती दिली होती. या पार्श्वभूमीवर, आधीच्या अंतरिम आदेशाने विशेष अनुमती याचिका आता निरर्थक ठरल्या आहेत, असे जेव्हा सर्वोच्च न्यायालय म्हणते त्याचा नेमका अर्थ काय? तसेच हे मत नोंदवून याचिका निकाली काढल्या जाण्याने उच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांवर आधी दिलेली अंतरिम स्थगिती कायम झाली आहे की ती उठली आहे, या मुद्द्यांवर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. (विशेष प्रतिनिधी)