शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बांधकाम मुख्य अभियंत्याला मुख्यमंत्र्यांपुढे उभे करण्याची तंबी

By admin | Updated: August 15, 2014 00:38 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यांना थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपुढेच उभे करण्याची तंबी येथील काँग्रेसच्या आमदारांनी दिली आहे.

काँग्रेस आमदाराकडून झाडाझडती : सहा महिन्यांपासून दोन कोटींची निविदा थंडबस्त्यात यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यांना थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपुढेच उभे करण्याची तंबी येथील काँग्रेसच्या आमदारांनी दिली आहे. स्थानिक धामणगाव मार्गावर बायपास ते मोहाफाटा या सुमारे तीन किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मार्चमध्ये मंजूर झाले. यवतमाळच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने एक कोटी ९८ लाख रुपये किंमतीची २१ टक्के कमी दराची निविदा मंजूर केली. दीड कोटींवरील कोणत्याही कामाला मुख्य अभियंत्याची परवानगी आवश्यक असल्याने ही निविदा अमरावती येथे पी.एस. मंडपे यांच्याकडे पाठविण्यात आली. मात्र मंडपे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून ही निविदा थंडबस्त्यात ठेवली. त्याला मंजुरीही दिली नाही किंवा नाकारलीही नाही. दरम्यान विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सर्वच पक्षाच्या आमदारांची उद्घाटन, भूमिपूजनासाठी धडपड सुरू आहे. आमदारांनी आपली कोणती कामे रखडली याचा शोध चालविला आहे. हा शोध घेत असतानाच सहा महिन्यांपासून धामणगाव रोडचे काम निविदा मंजूर होऊनही सुरू झाले नसल्याची बाब यवतमाळच्या आमदार नंदिनी नीलेश पारवेकर यांच्या निदर्शनास आली. चौकशीअंती ही फाईल अमरावतीचे मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यांच्याकडे पडून असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सोमवार ११ आॅगस्ट रोजी नंदिनी पारवेकर यांनी मंडपे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क केला. तेव्हा मंडपे यांनी ही बाब गांभीर्याने न घेता मुंबई स्टाईल पाहतो-करतो अशी उत्तरे दिली. त्यामुळे त्या संतप्त झाल्या. त्यांनी मंडपे यांची चांगलीच झाडाझडती घेतली. एवढेच नव्हे तर तुम्हाला थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे उभे केले जाईल, अशी तंबीही दिली. त्यामुळे मंडपे चांगलेच हादरले. (जिल्हा प्रतिनिधी) ‘लोकमत’च्या दणक्याने मंडपेंची हजेरी वाढलीपी.एस. मंडपे हे अमरावतीत नियुक्ती झाल्यापासूनच सतत ‘मुंबईवारी’ने वादग्रस्त ठरले आहेत. मुंबईत बसून अमरावतीचा कारभार पाहण्याच्या पद्धतीमुळे ३१ जुलै रोजी काँग्रेसच्या एका आमदारालाही भेटीशिवाय परत जावे लागले होते. ‘लोकमत’च्या दणक्यामुळे मंडपे आता कार्यालयात दिसू लागल्याचे कंत्राटदार व बांधकाम अधिकारी-कर्मचारी सांगतात. मंडपेंकडे मुंबईच्या विशेष प्रकल्प विभागाचा अतिरिक्त प्रभार अद्यापही कायम असल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्रालय त्यांच्यावर किती ‘खूश’ आहे, हे स्पष्ट होते.