शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तस्लीमा नसरीन यांचा महाराष्ट्र दौरा रोखण्यामागे षडयंत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 14:27 IST

बांगलादेशमधील वादग्रस्त लेखिका तस्लीमा नसरीन शनिवारी जेव्हा औरंगाबादला पोहोचल्या तेव्हा त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे त्यांना विमानतळावरुनच पुन्हा माघारी पाठवण्यात आलं.

ठळक मुद्देतस्लीमा नसरीन 30 जुलै रोजी जेव्हा औरंगाबादला पोहोचल्या तेव्हा विमानतळावरुनच पुन्हा माघारी पाठवण्यात आलं तस्लीमा यांचा दौरा पुर्णपणे खासगी होता, ज्याची माहिती फक्त पोलिसांना होती. अशा परिस्थितीत ही माहिती लीक कशी झाली असा प्रश्न विचारला जात आहेशहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले होते.

मुंबई, दि. 1 - बांगलादेशमधील वादग्रस्त लेखिका तस्लीमा नसरीन शनिवारी 30 जुलै रोजी जेव्हा औरंगाबादला पोहोचल्या तेव्हा त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे त्यांना विमानतळावरुनच पुन्हा माघारी पाठवण्यात आलं. तस्लीमा यांचा दौरा रद्द झाल्याने सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. तस्लीमा यांचा दौरा पुर्णपणे खासगी होता, ज्याची माहिती फक्त पोलिसांना होती. अशा परिस्थितीत ही माहिती लीक कशी झाली असा प्रश्न विचारला जात आहे.   

शनिवारी औरंगाबादेत आलेल्या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांना पोलिसांनी प्रवेश नाकारत चिकलठाणा विमानतळावरून परत पाठविले होते. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेट देण्यासाठी तीन दिवसांच्या दौ-यानिमित्त तस्लीमा नसरीन औरंगाबादमध्ये आल्या होत्या. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले होते.

जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेट देण्यासाठी  वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन औरंगाबादेत विमानाने येत असून त्या हॉटेल ताज येथे मुक्कामी थांबणार आहेत,अशी माहिती शहरात पसरताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल ताज आणि चिकलठाणा विमानतळावर मोठ्या संख्येने गर्दी केली आणि घोषणाबाजी करण्यास सुरवात केली होती. 

मात्र हे सर्व जाणुनबुजून करण्यात आल्याचा आरोप तस्लीमा नसरीन यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. तस्लीमा नसरीन यांच्या दौ-याची माहिती बाहेर कशी आली याची माहिती पोलीस सध्या घेत आहेत. नसरीन यांनी यासंबंधी ट्विट करत लिहिलं होतं की, 'औरंगाबाद पोलिसांशिवाय माझ्या हॉटेल बुकिंग आणि दौ-याची माहिती कोणालाच माहिती नव्हती. मग कट्टरपथियांना ही सगळी माहिती कशी मिळाली याचं आश्चर्य वाटतं'. 

तस्लीमा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचा-यांपैकी एकाने दिलेल्या माहितीनुसार, तस्लीमा यांची फ्लाईट डिटेल्स, हॉटेल बुकिंग आणि चार दिवसांच्या दौ-यासंबंधी माहितीचे कागदपत्र प्रोटोकॉलनुसार दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आले होते. दिल्लीमध्ये तस्लीमा नसरीन यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचा-याने दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्ली पोलीस अशा दौ-यांवेळी स्थानिक पोलिसांवर सुरक्षेची जबाबदारी सोपवतं. 27 जुलै रोजी औरंगाबाद पोलिसांना सुरक्षा पुरवण्याचा आदेश देण्यात आला होता. इतकंच नाही हॉटेलचं बुकिंगही दुस-या नावे करण्यात आलं होतं'.

काय झालं होतं नेमकं -आमदार इम्तियाज जलील यांनी पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून तस्लीमा यांना शहरात प्रवेश दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, प्रेषितांबद्दल अपशब्द लिहिणा-या या लेखिकेला शहराच्या पवित्र भूमित पाय ठेवता येणार नाही, असा इशारा दिला होता. एअर इंडियाच्या विमानाने रात्री साडेसात वाजता तस्लीमा विमातळावर येताच पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी तिची भेट घेतली आणि मॅडम तुम्हाला शहरात प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. यावेळी तस्लीमा  यांनी त्यांचा नियोजित दौरा अत्यंत गुप्त असल्याचे पो.नि.परोपकारी यांना सांगितले होते. तेव्हा परोपकारी यांनी त्यांना तुमचा दौरा गुप्त राहिलेला नाही.तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये थांबणार आहात,कोठे जाणार आहात,याबाबतची माहिती संपूर्ण शहरात पसरली असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे तुम्ही परत जा,अशी विनंती केली. एवढेच नव्हे तर विमानतळ अधिका-यांशी संपर्क साधून तस्लीमा आणि त्यांच्या मुलीला परत घेऊन जाण्याची विनंती केली होती.