शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हे तर सपा-भाजपाचे कारस्थान

By admin | Updated: May 9, 2014 01:14 IST

वाराणशीत ‘रॅली’साठी परवानगी नाकारल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादावर बसपा अध्यक्ष मायावती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

 लखनौ : वाराणशीत ‘रॅली’साठी परवानगी नाकारल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादावर बसपा अध्यक्ष मायावती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर वाराणशीतील वातावरण खराब करण्यासाठी समाजवादी पक्ष व भाजपाने एकत्रितपणे केलेले हे षड्यंत्र आहे. धार्मिक तणाव निर्माण व्हावा यासाठी मोदी यांना बेनियाबाग येथे सभेची परवानगी नाकारण्यात आली असा आरोप मायावती यांनी लावला आहे. १२ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात राजकीय लाभ घेण्यासाठी भाजपाकडून ही चाल खेळण्यात आली आहे. वाराणशीच्या वातावरणाला हिंदू-मुस्लीम रंग देऊन आझमगढ येथेदेखील फायदा करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वाराणशीतून मोदी तर आझमगढ येथून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव निवडणूक लढत आहेत. समाजवादी पक्षाच्या सरकारनेच भाजपाला निवडणूक आयोगाच्या विरुद्ध धरणे आंदोलन करण्याची संधी दिली. भाजपा वाराणशीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अन् सपाकडून त्यांना मदत करण्यात येत आहे, असे प्रतिपादन मायावती यांनी केले. यावेळी मायावती यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांवरदेखील टीका केली. काही अधिकारी राजकीय पक्षांना लाभ मिळावा यासाठी जाणूनबुजून राजकीय वातावरण तापविण्यासाठी हे नाटक करीत आहेत. जर सुरक्षेसंदर्भात मोदी यांना काही धोका आहे तर त्यासाठी योग्य ती व्यवस्था करणे ही समाजवादी पक्षाच्या शासनाची जबाबदारी आहे. परंतु षड्यंत्र असल्याने सरकारने हात झटकले आहेत. म्हणूनच तर सपा नेते मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्याचे वक्तव्य करत आहे असे मायावती म्हणाल्या.