शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटगृहांत बाहेरील खाद्याला मनाईबाबत विचार करा - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 04:35 IST

मल्टिप्लेक्सच्या संघटनांकडून सूचना घेऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेऊ देण्याबाबत ठोस भूमिका घ्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला केली.

मुंबई : मल्टिप्लेक्सच्या संघटनांकडून सूचना घेऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेऊ देण्याबाबत ठोस भूमिका घ्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला केली.प्रेक्षकांना बाहेरील पदार्थ चित्रपटगृहांत नेण्यासंदर्भात याचिकाकर्ते जनेंद्र बक्सी यांनी काही सूचना गुरुवारी न्यायालयात सादर केल्या. त्यांच्याही विचार करण्याची सूचना न्या. आर. एम. बोर्डे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने गृहविभागाला केली. बाहेरचे खाद्यपदार्थ चित्रपटगृहांत नेण्यास बंदी घालण्यासंदर्भात कोणतीही कायदेशीर तरतूद नसतानाही प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यात येते. वास्तविक, महाराष्ट्र सिनेमा (रेग्युलेशन) रुल्स नुसार, चित्रपटगृहांत व आॅडिटोरियमध्ये खाद्यपदार्थ विकण्यास मनाई आहे, असे याचिकेत म्हटले आहे.गेल्या सुनावणीत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना यासंबंधी सूचना करण्याचे निर्देश दिले होते. त्याचे पालन करत याचिकाकर्त्यांचे वकील आदित्य प्रताप यांनी न्यायालयात सूचनांची यादीच सादर केली. बाहेरील खाद्यपदार्थांना व पाणी नेण्यास बंदी घालण्याविरुद्ध परवान्यामध्येच बंधनकारक तरतूद करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी सूचना याचिकाकर्त्यांनी केली आहे.दरम्यान, या याचिकेत एफआयसीसीआय या मल्टिप्लेक्स मालकांच्या संघटनांनी मध्यस्थी याचिका केली आहे. या याचिकेमुळे मल्टिप्लेक्सच्या मालकांच्या अधिकारांवर गदा येणार आहे. त्यामुळे या याचिकेत मध्यस्थी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती संघटनेने उच्च न्यायालयाला केली. त्यावर सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, राज्य सरकार सर्व पक्षांची बाजू ऐकून त्यानुसार निर्णय घेण्यास तयार आहे. न्यायालयाने सरकारचे म्हणणे मान्य करत दोन आठवड्यांनी या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :Courtन्यायालय