शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उष्णतेचा पक्ष्यांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

By admin | Updated: May 19, 2016 03:11 IST

दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे मानवी जीवनाबरोबरच पक्ष्यांनाही शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नवी मुंबई : दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे मानवी जीवनाबरोबरच पक्ष्यांनाही शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील पशुपक्ष्यांवर उपचार करणाऱ्या वाशीतील भूमी जीवदया या सामाजिक संस्थेच्या वतीने उष्णतेमुळे पक्ष्यांवर होणाऱ्या आजारांवर मोफतपणे उपचार केले जात आहेत. उष्णतेच्या लाटेबरोबरच पाणीटंचाईची समस्या असल्याने पाणी न मिळाल्याने अनेक चिमण्यांना जीव गमवावा लागत आहे, तर पुरेसे पाणी न मिळाल्याने आकाशात झेप घेणारे हे पक्षी खाली कोसळल्याने दुखापत होण्याचे प्रमाणही वाढले आहे. शहरीकरणामुळे जंगल नष्ट झाले असून, पक्ष्यांना हक्काचा निवारा मिळत नाही. त्यामुळे इमारतीच्या जंगलात राहणा-या या पक्ष्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाण्याची तहान भागविण्यासाठी भूमी जीवदया संस्थेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी भांडी ठेवली जात असून, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही या भांड्यांचे वाटप करण्यात आले आहे. पंखांना इजा होणे, पायाला दुखापत होणे, अशक्तपणा आदींवर इलाज केले जात असल्याची माहिती भूमी जीवदया संस्थेचे सागर सावला यांनी सांगितले. कबुतर, कोंबडी यासारख्या पक्ष्यांमध्ये राणीखेत (मानमोडी)सारखे आजार पाहायला मिळत असून, यामध्ये पक्ष्यांच्या अंगावर पुरळ उठणे तसेच ३६० अंशात मान मोडणे अशी लक्षणे पाहायला मिळतात. वाढत्या उष्णतेमुळे ती सहन न झाल्याने अशा प्रकारच्या आजारांचे प्रमाण पाहायला मिळत असल्याची माहिती डॉ. महेंद्र चौधरी यांनी दिली. पक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणात डीहायड्रेशनचा त्रास सहन करावा लागत असल्याचे डॉ. महेंद्र चौधरी यांनी सांगितले. नागरिकांनी घराच्या खिडकीत, गॅलरीमध्ये, कार्यालयात छोटेसे भांडे ठेवावे. त्यात पाणी ठेवल्यास पक्ष्यांची तहान भागवता येईल, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहान पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आले आहे. उडता उडताच बेशुद्ध दिवसेंदिवस कमी होणार हरीत पट्टे, पाण्याच्या शोधात दूरवर उडणाऱ्या या पक्ष्याच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने उडता उडता बेशुद्ध पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून, भूमी जीवदयाचे स्वयंसेवक स्वत: तिथे जाऊन या पक्ष्यांवर इलाज करीत आहेत. यामध्ये घारी, कबुतर, पोपट, बगळे आदी पक्ष्यांचा समावेश असून, या पक्ष्यांना मल्टिव्हिटॅमिन्स, ग्लुकोजचे पाणी तसेच अ‍ॅण्टिबायोटिक्स देऊन ते बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा स्वच्छंदीपणे झेप घेण्यासाठी सोडले जाते.