भाजपा सरकारच्या फसव्या व खोटारडेपणाच्या विरोधात कॉग्रेसची संघर्षयात्रा

By admin | Published: August 25, 2016 09:58 AM2016-08-25T09:58:11+5:302016-08-25T09:58:11+5:30

नतेला खोटी व फसवी आश्वासने देऊन केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडण्यासाठी पुणे जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या जनसंघर्ष यात्रा सुरु करण्यात आली

Congress's struggle against corruption and betrayal of BJP government | भाजपा सरकारच्या फसव्या व खोटारडेपणाच्या विरोधात कॉग्रेसची संघर्षयात्रा

भाजपा सरकारच्या फसव्या व खोटारडेपणाच्या विरोधात कॉग्रेसची संघर्षयात्रा

Next

ऑनलाइन लोकमत

लोणावळा,  दि. २५ -  जनतेला खोटी व फसवी आश्वासने देऊन केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडण्यासाठी पुणे जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या जनसंघर्ष यात्रा सुरु करण्यात आली आहे. पुणे कॉग्रेस भवन येऊन सुरु झालेल्या या यात्रेच्या पहिल्या दिवसाची सांगता आज लोणावळयात करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या खोटारडेपणाच्या विरोधात जनमानसांसाठी कॉग्रेस रस्त्यावर उतरली असल्याचे सांगितले.
      यावेळी संग्रामदादा मोहोळ, संजय उभे, महेश ढमढेरे, संजय हरपळे, अॅड. सोमनाथ दौंडकर, हाजीमलंग मारीमत्तू, गोपाळ तंतरपाळे, लोणावळा शहर कॉग्रेसचे अध्यक्ष नारायण आंबेकर, दत्तात्रय गवळी, किरण गायकवाड, निखिल कविश्वर, दीपक सायसर, अमोल पवार, अमोल दौंडकर, वंदना सातपुते, भरत तिखे आदी उपस्थित होते.
     यावेळी बोलताना संजय जगताप म्हणाले दोन वर्षापुर्वी भाजपाने लोकसभा व विधानसभेच्या निवडणूकी दरम्यान देशवासीयांना काळा पैसा देशात आणत प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करु, महागाई नियंत्रणात ठेऊ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू, दरवर्षी २ कोटी रोजगार देऊ अशा शेकडों रंजित घोषणा व आश्वासने देत सत्ता मिळवली मात्र यापैकी एकही आश्वासन भाजपा पुर्ण करु शकली नाही, असे असताना पुन्हा नवी आश्वसने देऊन भाजपाची नागरिकांची दिशाभूल करत आहे. दोन वर्षापासून शासनाने विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही, सर्वसामान्यांवर करांचा बोजा लादत भांडवलदारांना सुट देण्याचा गोरस धंदा या सरकारने सुरु केला आहे. ज्यांचा आदर्श समाजांने घ्यावा असे अनेक मंत्री बोगस पदव्यांच्या प्रकरणात आडकले आहेत. केंद्रातील भाजपा सरकारला अडीच वर्ष झाली तर राज्य सरकारला दोन वर्ष पुर्ण होणार असताना ही मंडळीं आजही आश्वसने देण्यातच मश्गूल आहेत, त्यांना कामांचे भान राहिलेले नाही, सर्वसामान्य माणूस या आश्वासनाच्या होळीत होरपळ असताना भाजपा सरकार जुलमी कायदे करत सर्वसामान्यांना वेटीस धरु पहात आहे. ज्या प्रमाणे ब्रिटिश सरकारच्या विरोधात असहकार व सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु करण्यात आली होती त्याचप्रमाणे कॉग्रेस जन संघर्ष यात्रेच्या माध्यमातून भाजपा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. जगताप म्हणाले दोन वर्षात भाजपाने देशाला दहा वर्षे मागे नेहले आहे. 

भारत हा कुठुंबप्रधान देश

भारत हा कुठुंबप्रधान देश असताना भाजपा सरकार या देशात शंभर पेक्षा जास्त लोक एखादया समारंभा निमित्त एकत्र येणार असले तरी पोलीस परवाना घेणे अनिवार्य करण्याचा कायदा करु पहात आहे. भारताच्या अखंडत्वाला तडा देण्याचा हा फतवा असून नागरिकांनी भाजपा सरकारच्या या जाचक कायदयाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरावे असे आवाहन जगताप यांनी केले.

Web Title: Congress's struggle against corruption and betrayal of BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.