शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
4
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
5
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
6
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
7
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
8
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
9
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
10
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
11
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
12
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
13
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
14
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
15
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
16
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
17
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
18
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
19
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
20
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स

लादलेल्या उमेदवारींमुळेच काँग्रेसचे ‘बुरे दिन’

By admin | Updated: July 20, 2014 01:22 IST

शहरात एकेकाळी काँग्रेसचे सर्वच्या सर्व आमदार निवडून येत होते. काही मतदारसंघ हे काँग्रेसचा गड होते. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पुढे राहते त्याच मतदारसंघात

कार्यकर्ता मेळावा : शहराध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांना दाखविला आरसा नागपूर : शहरात एकेकाळी काँग्रेसचे सर्वच्या सर्व आमदार निवडून येत होते. काही मतदारसंघ हे काँग्रेसचा गड होते. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पुढे राहते त्याच मतदारसंघात विधानसभेत काँग्रेस का हरते, यावर चिंतन करण्याची गरज आहे. प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी देताना डावलले जाते. दिल्ली दरबारी वजन वापरून उमेदवारी आणली जाते. अशा लादलेल्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे ‘बुरे दिन’ आले आहेत, असे परखड मत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या समक्ष काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले. शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी जुना काटोल रोड चौक स्थित बचत सभागृहात पश्चिम नागपूर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विनोद गुडधे पाटील, आ. दीनानाथ पडोळे, माजी खा. गेव्ह आवारी, यादवराव देवगडे, प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता, शेख हुसेन, सरचिटणीस अतुल कोटेचा उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी, नितीश ग्वालबंशी यांच्यासह तन्हा नागपुरी, अनिल परतेकी आदींनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. विकास ठाकरे यांनी मेळाव्याची भूमिका स्पष्ट करताना आक्रमक भूमिका मांडली. काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांवर सातत्याने जो अन्याय सुरूआहे, त्यावरून कदाचित नक्षलवादी असेच तयार होत असतील, असे परखड मत त्यांनी मांडले. राज्यमंत्री राजेंद्र मुळक म्हणाले, पश्चिम नागपूर काँग्रेसचा गड होता. परंतु २० वर्षांपासून तिथे काँग्रेस नाही. पश्चिमचा आमदार कोण हे सुद्धा जनतेला माहिती नाही. विधानसभेत त्यांनी मतदारसंघातील प्रश्न उपस्थित केला नाही. येत्या निवडणुकीत आम्ही सर्व एकसंघ होऊन काँग्रेसला विजयी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संचालन घनश्याम मांगे तर आभार संजय सरायकर यांनी मानले. या वेळी सुनील चोपडा, दीपक वानखेडे, ईश्वर बरडे, अरुण डवरे, शिला मोहोड, सरस्वती सलामे, पदमा उइके, सुनील चोपडा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कितीही शहा आले तरी चिंता नाही - माणिकराव काँग्रेसचे विचार आणि शाहू, फुले आंबेडकरांचे विचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे कितीही शहा (भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा) आले तरी महाराष्ट्राची जनता आरएसएसला भीक घालणार नाही, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असे मत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. सत्तेसाठी संघाने काँग्रेसच्या विरोधात विषारी प्रचार केला. महात्मा गांधीजींची हत्या कोणत्या विचारांनी केली, हे लोकांना माहीत आहे. भाजपाचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला आहे. तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपसी मतभेद विसरावे. काँग्रेस वटवृक्ष आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. सर्वांचाच मान राखला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकमतच्या पोलखोलचा उल्लेखनागपूर महापालिका सामान्यजनांना मूलभूत सेवा देण्यास अपयशी ठरली आहे. अनेक योजना रखडलेल्या आहेत. याबाबत लोकमतने ‘ नो उल्लू बनाविंग’ हे विशेष पान काढून मनपाची पोलखोल केली, असा उल्लेख वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी यावेळी केला.