शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात काँग्रेसचा थाळी-लाटणे मोर्चा

By admin | Updated: October 20, 2015 20:32 IST

डाळी, कडधान्ये आणि भाज्यांच्या वाढत्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसने थाळी-लाटणे जोरात वाजवत मोर्चा काढला.

ऑनलाईन लोकमत

मुंबई, दि.२० - डाळी, कडधान्ये आणि भाज्यांच्या वाढत्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसने थाळी-लाटणे जोरात वाजवत मोर्चा काढला. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. थाळी- लाटणे जोराजोरात वाजवून झोपलेले सरकार जागे करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. निवडणुकीपुर्वी महागाईविरोधात तावातावाने बोलणारे भाजपा नेते मोदींच्या कार्यकाळातील गगनाला भिडणा-या महागाईवर चिडीचूप आहेत. असा सवाल संजय निरुपस यांनी उपस्थित केला. 
भाजपा सरकारच्या कालावधीत भारतात डाळींच्या किमती गगनाला भिडत असताना निषेध करणारे भाजपाचे खासदार आता कुठेही दिसत नाही. सध्या भारतात तुरडाळ २०० रुपये किलोने विकली जात आहे. याचवेळी शेजारील पाकिस्तानात ७०, बांगलादेशात ६५, नेपाळ मध्ये ६८, बर्मा येथे ७२, तर श्रीलंकेत ६४ रुपयांने विकली जात असल्याचा आरोप निरुपम यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महागाईला डायन असे मोदी म्हणायचे आणि आता पंतप्रधान होऊन दीड वर्ष झाले तरी महागाई कमी न होता अधिकच वाढत आहे. याला मोदी, विकास म्हणणार की अच्छे दिन, असा सवाल निरुपम यांनी केला.